IPL 2022, Delhi Capitals : आयपीएलच्या 15 व्या हंगामात दिल्लीची कामगिरी सरासरी झाली आहे. खेळाडू आणि कोचला कोरोनामुळे गाठले होते, त्यामुळे दिल्लीच्या अडचणी वाढल्या होत्या. पण आता दिल्लीच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाबाधित झालेले मिचेल मार्श आणि टीम सायफर्ट परतले आहेत. दोन्ही खेळाडूंनी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलाय. त्याशिवाय संघाच प्रमुख कोच रिकी पाँटिंगनेही विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलाय.
मिचेल मार्श, टीम सायफर्ट आणि कोच रिकी पाँटिंग दिल्लीच्या संघासोबत जोडले गेले आहेत. त्यामुळे दिल्लीची ताकद नक्कीच वाढली असणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ खेळत आहे. गुरुवारी दिल्लीचा सामना कोलकात्याशी होणार आहे. त्यापूर्वी महत्वाचे दोन खेळाडू आणि कोच संघासोबत जोडले गेले आहेत.
मिचेल मार्श आणि टीम सायफर्टचा फोटो पोस्ट करत दिल्लीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन्ही खेळाडू संघासोबत जोडले आहेत. दोन्ही खेळाडूंनी संघासोबत सरावही केला. ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीला राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली होती. आता दिल्लीचा सामना कोलकात्याविरोधात होणार आहे. दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीला राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली होती. आता दिल्लीचा सामना कोलकात्याविरोधात होणार आहे. दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात दिल्लीची कामगिरी सरासरी राहिली आहे. सात सामन्यात दिल्लीला तीन विजय मिळवता आले आहेत. तर चार परभवाचा सामना करावा लागलाय. सहा गुणांसह दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता आठव्या क्रमांकावर आहे. गुरुवारी होणारी ही लढत रोमांचक होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-