Royal challengers bangalore Qualifier 2 : आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत क्वॉलीफायर 2 पर्यंत मजल मारलेल्या आरसीबी संघाचा सामना आज राजस्थान रॉयल्ससोबत पार पडणार आहे. एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपरजायंट्स सारख्या दमदार संघाला मात देत आरसीबीने इथवर मजल मारली आहे. आतापर्यंत आरसीबी संघाने त्यांच्या गोलंदाजीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. एक तगडं गोलंदाजी युनिच आरसीबीकडे असल्याने आजही राजस्थानविरुद्ध सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांकडे अधिक लक्ष्य असेल. तर या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याआधी कोणते 5 आरसीबीचे खेळाडू आपली छाप सोडू शकतात, त्यावर नजर फिरवूया...


विराट कोहली  


यंदाच्या हंगामात खास कामगिरी करु न शकल्याने विराट कोहलीकडून अनेकांना निराशा मिळाली आहे. पण लीग सामन्यांत गुजरात सारख्या तगड्या संघाविरुद्ध कोहलीने 73 धावांची तुफान खेळी केली. लखनौविरुद्ध 25 धावाच कोहलीने केल्या असल्या तरी आज महत्त्वाच्या सामन्यात त्याच्याकडून अनेकांना अपेक्षा नक्कीच असतील.


ग्लेन मॅक्सवेल 


एक स्टार अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या ग्लेनकडून आज संघाला गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अपेक्षा असणार आहेत. त्यामुळे मॅक्सेवलवर अनेकांच्या नजरा टिकून असतील.


दिनेश कार्तिक  


आरसीबीचा यंदाच्या हंगामात एकप्रकारे पाठीचा कणा झालेल्या दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजीने दमदार कामगिरी केली आहे. लखनौविरुद्धही त्याने चांगली फलंदाजी केली. त्यामुळे आज या महत्त्वाच्या सामन्यात त्याच्याकडून अनेकांना अपेक्षा असणार आहेत.  


वानिंदू हसरंगा


पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या हसरंगाने यंदा अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. त्यामुळे आजही त्याच्याकडून महत्त्वाच्या विकेट्स मिळतील अशी संघाला अपेक्षा असेल.


जोस हेझलवुड


काही सामन्यात खास कामगिरी केली नसली तरी हेझलवुडने यंदाच्या हंगामात आरसीबीसाठी अत्यंत चांगली खेळी केली आहे. लखनौविरुद्धच्या विजयात त्याने एकहाती गोलंदाजी केली. त्यामुळे आजही तो चांगली कामगिरी करु शकतो.


 हे देखील वाचा-