IPL 2022 : आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) विराट कोहलीबाबत (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं आहे. मॅक्सवेल असा विश्वास आहे की, विराट कोहली कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय तणावमुक्त दिसत आहे, जे विरोधी संघांसाठी धोकादायक लक्षण आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएलनंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणाऱ्या कोहलीने राष्ट्रीय टी-20 आणि कसोटी संघांचे कर्णधारपदही सोडले होते, तर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून वगळण्यात आले होते.


ग्लेन मॅक्सवेलचा असा विश्वास आहे की, विराट कोहली मैदानावर पूर्वीसारखा आक्रमक क्रिकेटपटू राहिला नाही आणि हे आश्चर्यकारक आहे. आरसीबीच्या पॉडकास्टवर मॅक्सवेल म्हणाला, विराटने कर्णधारपदाची जबाबदारी सोडली आहे जे त्याच्यासाठी एक मोठे ओझे असावे. कदाचित काही काळ त्याच्यावर हे ओझे होते आणि आता तो त्यातून मुक्त झाला आहे. कदाचित विरोधी संघासाठी धोकादायक बातमी आहे.


मॅक्सवेलने आनंद व्यक्त केला आहे की कोहली अशा टप्प्यावर आहे जिथे तो खेळाची खरी मजा घेऊ शकेल. 'विराटला थोडे तणावमुक्त आणि आरामशीर राहणे विराटसाठी फायदेशीर ठरेल. त्याला त्याच्या कारकिर्दीची पुढील काही वर्षे कोणत्याही दबावाशिवाय खेळण्यात आणि अनुभव घेता येईल', असे मॅक्सवेल म्हणाला. तो पुढे म्हणाला की, विराट खूप आक्रमक स्पर्धक होता जो मैदानावरच तुम्हाला उत्तर द्यायचा. त्याने नेहमीच खेळावर आणि प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. 


ग्लेन मॅक्सवेलने सांगितले की त्याला कोहलीसोबत क्रिकेटबद्दल बोलणे आवडते आणि कोहली त्याचा जवळचा मित्र झाला याचे मॅक्सवेलला आश्चर्य वाटते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha