DC vs RR, Match Highlights : दिल्लीचा पराभव, राजस्थानने सामना 15 धावांनी जिंकला
IPL 2022 : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हा सामना पार पडत आहे.
अखेरच्या षटकापर्यंत गेलेला सामना अखेर दिल्लीने गमावला. 15 धावांनी दिल्ली पराभूत झाली आहे. पण अखेरच्या षटकात रोवमेन पोवेलने एक दमदार खेळीचं दर्शन घडवलं.
सामन्यात अत्यंत महत्त्वाची अशी ओव्हर म्हणजे 19 वी. आज राजस्थानसाठी अतिशय महत्त्वाची ठरलेली ही ओव्हर प्रसिधने टाकली. विशेष म्हणजे त्याने ही निर्धाव टाकत सेट फलंदाज ललित यादवला त्याने बाद केलं.
ललित यादव आणि रोवमेन पोवल दमदार फलंदाजी करत असून दिल्लीला अखेरच्या दोन षटकात 36 धावांची गरज आहे.
शार्दूल ठाकूर 10 धावा करुन धावचीत झाला आहे.
DC vs RR, Match Live Updates : यजुवेंद्र चहलने अक्षर पटेलला बाद करत राजस्थानला पाचवं यश मिळून दिले. दिल्ली पाच बाद 128 धावा... दिल्लीला विजयासाठी 40 चेंडूत 94 धावांची गरज
दोन जीवदान मिळाल्यानंतर देखील अखेर तिसऱ्या वेळेस ऋषभ पंत बाद झाला आहे. पंत 44 धावा करुन तंबूत परतला. प्रसिधच्या ओव्हरमध्ये पडिक्कलने त्याचा झेल घेतला.
दिल्लीला दुसरा झटका बसला असून आश्विनने पृथ्वी शॉ याला बाद केलं आहे. शॉ 37 धावा करुन बाद झाला असून दिल्लीचा स्कोर 10 षटकानंत 99 वर 2 बाद आहे.
DC vs RR : दिल्लीला दुसरा धक्का बसला आहे. डेव्हिड वॉर्नरनंतर सरफराज खान बाद झाला आहे. सहा षटकानंतर दिल्लीच्या दोन बाद 60 धाव झाल्या आहेत.
जोस बटलरच्या तुफान खेळीसह पडिक्कलचं अर्धशतक आणि सॅमसनच्या फिनिशिंगने राजस्थानने दिल्लीला 223 धावाचं आव्हान दिलं आहे.
अप्रतिम शतक झळकावून 116 धावांवर जोस बटलर बाद झाला आहे. मुस्तफिजूरने त्याला बाद केलं आहे.
राजस्थान संघाने 200 धावांचा टप्पा पार केला आहे. 19 षटकानंतर राजस्थानचा स्कोर 202 वर दोन बाद आहे.
जोस बटलरने आजही दमदार कामगिरी करत यंदाच्या हंगामातील तिसरं शतक ठोकलं आहे. 57 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकार ठोकत त्याने शतक पूर्ण केलं आहे.
तुफान फटकेबाजीनंतर राजस्थानला पहिला झटका बसला आहे. देवदत्त पडिक्कल 54 धावा करुन बाद झाला आहे.
राजस्थानच्या सलामी फलंदाजांनी वादळी फलंदाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढली. दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. बटलर 82 तर पडिकल 53 धावांवर खेळत आहेत. राजस्थान 14 षटकानंतर बिनबाद 137 धावा
DC vs RR, Match Live Updates : राजस्थानची सलामी फलंदाज जोश बटलर आणि देवदत्त पडिकल यांनी दिल्लीच्या गोलंदाजांची धुलई केली आहे. 13.2 षटकात राजस्थान बिनबाद 132 धावा. बटलर 81 तर देवदत्त पडिकल 49 धावांवर खेळत आहे.
राजस्थानच्या फलंदाजीची 10 षटकं संपली असून पडीक्कल आणि बटलरने भागिदारी करत 87 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.
सहा षटकं संपली असून राजस्थान एक संयमी खेळी करताना दिसत आहे. बटलर आणि पडिक्कलने मिळून 6 षटकात 44 धावा केल्या आहेत.
संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, करुन नायर, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल.
ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, शार्दूल ठाकूर.
नुकतीच नाणेफेक पार पडली असून दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आजवरच्या इतिहासाचा विचार करता राजस्थान आणि दिल्ली संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 - 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज सामना कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष असून यंदाच्या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत.
संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, करुन नायर, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल.
ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, खलील अहमद.
यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दिल्ली आणि राजस्थानचा संघ आमने-सामने आले आहेत.
पार्श्वभूमी
DC vs RR, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 34 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) या दोन संघात पार पडत आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2022) आतापर्यंत दिल्लीने 6 सामने खेळत 3 सामने जिंकून 3 गमावले आहेत. तर राजस्थाननेही 6 सामने खेळून 4 सामने जिंकले असून 3 गमावले आहेत. त्यामुळे राजस्थानचं आव्हान दिल्लीसाठी अवघड असणार असून आहे.
आजचा सामना प्रसिद्ध अशा मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. सामना सायंकाळी असल्याने दवाच्या अडचणीमुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेत असतो. पण वानखेडेमध्ये मागील दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. वानखेडेतील चौकार इतर मैदानांच्या दृष्टीने कमी असल्याने आज एक मोठी धावसंख्या उभी राहण्याची शक्यता आहे. आजवरच्या इतिहासाचा विचार करता राजस्थान आणि दिल्ली संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 - 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज सामना कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष असून यंदाच्या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत.
दिल्ली अंतिम 11
ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, शार्दूल ठाकूर.
राजस्थान अंतिम 11
संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, करुन नायर, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल.
हे देखील वाचा-
- DC vs PBKS, IPL 2022 : दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएलच्या सामन्यात बदल; पुण्याऐवजी मुंबईत होणार सामना
- RR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार
- Mitchell Marsh Covid Positive: दिल्लीचा ऑलराऊंडर मिशेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -