DC vs PBKS, Match Highlights : पंजाबचा दारुण पराभव, दिल्ली 9 गड्यांनी जिंकली
IPL 2022 : मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स हा सामना पार पडणार आहे.
abp majha web teamLast Updated: 20 Apr 2022 10:18 PM

पार्श्वभूमी
DC vs PBKS, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (DC vs PBKS) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. यंदाच्या हंगामात (IPL 2022)...More
DC vs PBKS, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (DC vs PBKS) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. यंदाच्या हंगामात (IPL 2022) आतापर्यंत दिल्लीने 5 सामने खेळत दोन सामने जिंकून तीन गमावले आहेत. तर पंजाबने 6 सामने खेळत तीन सामने जिंकले असून तीन गमावले आहेत.आजचा सामना आधी पुण्यातील एमसीए मैदानात पार पडणार होता. पण दिल्ली संघात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संघाचा लांबचा प्रवास टाळण्यासाठी सामने मुंबईत घेण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्यामुळे सामना आता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. आयपीएलमध्ये आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स तब्बल 28 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता पंजाबचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.दिल्ली अंतिम 11ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, खलील अहमद. पंजाब अंतिम 11 मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, वैभव अरोरा, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, नॅथन एलीस, राहुल चाहरहे देखील वाचा-DC vs PBKS, IPL 2022 : दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएलच्या सामन्यात बदल; पुण्याऐवजी मुंबईत होणार सामनाRR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकारMitchell Marsh Covid Positive: दिल्लीचा ऑलराऊंडर मिशेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
DC vs PBKS, Match Live Update : पंजाबचा दारुण पराभव, दिल्ली 9 गड्यांनी जिंकली
DC vs PBKS, Match Live Update : दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजीपुढे पंजाबच्या संघाची पुरती तारांबळ उडाली. दिल्लीच्या फरकी गोलंदाजांनी आधी पंजाबच्या फलंदाजांना अडकवले, त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी पंजाबच्या गोलंदाजांना धू धू धुतले. बुधवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 9 गड्यांनी पराभव केला. दिल्लीच्या गोलंदाजांनी पंजाबला 115 धावांवर रोखलं. त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी हे आव्हान 58 चेंडू आणि 9 गडी राखून सहज पार केले.