IPL 2022 : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार असून केकेआरच्या संघात एका धाकड खेळाडूने एन्ट्री केली आहे. इंग्लंडचा अॅलेक्स हेल्स याने माघार घेतल्याने आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आरॉन फिंच केकेआरमध्ये सामिल झाला आहे.
अॅलेक्स हेल्स याने माघार घेतल्याचं ट्वीटरवरुन जाहीर केलं. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन आरॉन फिंच संघात सामिल झाल्याचं ट्वीट केलं आहे. हेल्स याने मागील काही काळापासून सतत बायोबबलमध्ये असल्याने कुटुंबापासून दूर रहावं लागत असल्याने आयपीएलमधून माघार घेतल्याचं सांगितलं आहे.
श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद
आगामी आयपीएल 2022 (IPL 2022) चुरशीची होणार यात शंका नाही, कारण यंदा 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. दरम्यान नव्या आलेल्या संघानंतर स्पर्धेत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे सर्व संघामध्ये नवनवीन बदल झाले असून भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने विकत घेतलं. दरम्यान श्रेयसलाच कर्णधारपदही देण्यात आलं आहे. यंदा कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 12.25 कोटींची बोली लावली. पहिल्या दिवशी ईशान किशनपूर्वी सर्वाधिक पैसे श्रेयसला विकत घेण्यासाठीच खर्च करण्यात आले होते. दरम्यान कोलकाता संघ मागील बऱ्याच काळापासून एक चांगला कर्णधार मिळालेला नाही. गौतम गंभीरनंतर कोणत्याच कर्णधाराला खास कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान यामुळे संघ यंदा एका चांगल्या कर्णधाराच्या शोधात होता, हा शोध अखेर संपला असून श्रेयस अय्यरला 12.25 कोटींना विकत घेत केकेआरने कर्णधार मिळवला.
हे देखील वाचा-
- IPL 2022 Full Schedule: आयपीएल 2022 चं बिगुल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणाचा सामना कोणाशी? पाहा एका क्लिकवर
- IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?
- IPL Records : आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारे धाकड यष्टीरक्षक, 'हे' आहेत टॉप 5
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha