IPL Records : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पार पडणार आहे. त्यानंतर सर्वच संघ एक-एक करुन मैदानात उतरणार आहेत. तर या क्रिकेटच्या महासंग्रामाआधी काही महत्त्वाच्या रेकॉर्ड्सवर नजर फिरवुया.. यातील एक म्हणजे एका डावात सर्वाधिक धावा करणारे टॉप पाच यष्टीरक्षक फलंदाज कोण आहेत हे पाहुया... 


या टॉप 5 मध्ये चार भारतीय फलंदाज आहेत. ज्यात सर्वात पहिलं नाव म्हणजे, आतापर्यंत पंजाब संघाची धुरा सांभळणारा नुकताच लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार झालेला केएल राहुल (KL Rahul). राहुलने एका आयपीएल सामन्यात नाबाद 132 धावा केल्या असून त्याचे हे रेकॉर्ड आतापर्यंत कोणालाच मोडता आलेलं नाही. राहुलला आयपीएल 2022 च्या महालिलावापूर्वीच लखनौने तब्बल 17 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. यायादीत दुसऱ्या स्थानावर आहे, भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant). पंतने एका डावात नाबाद 128 धावा केल्या असून यंदाही तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. 16 कोटींना त्याला दिल्लीने संघात कायम ठेवले आहे.  


राजस्थान रॉयल्सचा हुकूमी एक्का संजू सॅमसन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एका सामन्यात 119 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या असून संजूला यंदाही राजस्थानने 14 कोटींना रिटेन केलं आहे. तर चौथ्या स्थानावर रिद्धिमान साहा असून त्याने एका डावात नाबाद 115 रन केले आहेत. आयपीएल 2022 च्या लिलावात गुजरात टायटन्सने त्याला 1.90 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. तर पाचव्या स्थानावर या यादीत यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो असून त्याने एका डावात नाबाद 114 धावा केल्या आहेत. यंदा तो पंजाब किंग्समध्ये 6.75 कोटी रुपये घेत शामिल झाला आहे. 


IPL च्या एका डावात सर्वाधिक धावा करणारे यष्टीरक्षक फलंदाज 



  1. केएल राहुल - 132*  

  2. ऋषभ पंत - 128*

  3. संजू सॅमसन - 119

  4.  रिद्धिमान साहा - 115*

  5.  जॉनी बेयरस्टो - 114 

  6. अॅडम गिलख्रिस्ट - 109*


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha