CSK vs SRH, Match Highlights : हैदराबादचा तगडा विजय, 8 विकेट्सनी चेन्नईला दिली मात

नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या दोघांमध्ये अटीतटीची लढत रंगत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Apr 2022 07:03 PM
CSK vs SRH : हैदराबादचा चेन्नईवर 8 विकेट्सनी विजय

राहुल त्रिपाठीने चौकार लगावत 17.4 षटकात हैदराबादला विजय मिळवून दिला आहे.

CSK vs SRH : ब्राव्होने घेतली अभिषेकची विकेट

18 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ब्राव्होने अभिषेक शर्माला जॉर्डनच्या हाती झेलबाद केलं आहे. शर्माने 75 धावा केल्या आहेत.

CSK vs SRH : हैदराबादला विजयासाठी 3 षटकात 10 धावांची गरज

चेन्नई चौथा सामनाही गमावणार अशी चिन्ह दिसत आहे. कारण हैदराबादला विजयासाठी 18 चेंडूत 10 धावांची गरज असून त्यांच्या हातात 9 विकेट्सही आहेत.

CSK vs SRH : अभिषेकचं अर्धशतक, हैदराबाद विजयाच्या जवळ

हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मानं अर्धशतक झळकावलं असून तो दमदार फलंदाजी करत आहे. आता हैदराबादला 33 चेंडूत 45 धावांची गरज आहे.

CSK vs SRH : हैदराबादला पहिला झटका, केन बाद

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन 32 धावा करुन तंबूत परतला आहे. हैदराबादला विजयासाछी 42 चेंडूत 58 धावांची गरज आहे.

CSK vs SRH : 9 षटकानंतर हैदराबाद 62 वर 0 बाद

हैदराबादने चांगली सुरुवात केली असून 9 षटकानंतर एकही विकेट न गमावता 62 धावा केल्या आहेत.

CSK vs SRH : हैदराबादचे सलामीवीर मैदानात

155 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी हैदराबादचे सलामीवीर मैदानात आले आहेत. अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन मैदानात आले आहेत.

CSK vs SRH : चेन्नईची 154 धावांपर्यंत मजल

अखेरच्या दोन षटकात जाडेजा-ब्राव्होने केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नईने 154 धावा केल्या आहेत. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी 155 धावांची गरज आहे.

CSK vs SRH : जाडेजा बाद

केन विल्यमसनने अप्रतिम झेल घेत जाडेजाला तंबूत धाडलं आहे. भुवनेश्वरच्या नावावर ही विकेट लागली असून जाडेजाने 23 धावा केल्या आहेत.

CSK vs SRH : धोनी झेलबाद

धोनी तीन धावा करुन बाद झाला आहे. मार्को जेन्सनने त्याला तंबूत धाडलं आहे.

CSK vs SRH : चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परत

चेन्नई सुपरकिंग्सला पाचवा झटका लागला असून शिवम दुबेला नटराजनने तंबूत धाडलं आहे. 

CSK vs SRH : मोईन अलीचं अर्धशतक थोडक्यात हुकलं

चेन्नईचा डाव मोईन अलीने सावरला होता. पण 48 धावा करुन तो बाद झाला आहे. मार्करमने त्याची विकेट घेतली आहे.

CSK vs SRH : अंबाती रायडू तंबूत परत

चेन्नई सुपरकिंग्सचा तिसरा गडी रायडू 27 धावा करुन बाद झाला आहे. सुंदरने त्याला बाद केलं आहे.

CSK vs SRH : मोईन अली-रायडूचं अर्धशतकी भागिदारी

चेन्नई सुपरकिंग्सचा डाव मोईन अली आणि अंबाती रायडूने सावरला असून दोघांची अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली आहे.

CSK vs SRH : 9 षटकानंतर चेन्नई 63/2

चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून सध्या मोईन अली आणि अंबाती रायडू मैदानात असून 9 षटकानंतर चेन्नईचा स्कोर 63 वर दोन बाद आहे.

CSK vs SRH : टी नटराजननं टीपला ऋतुराजचा बळी

टी नटराजनने उत्कृष्ट गोलंदाजी करत ऋतुराज गायकवाडला त्रिफळाचित केलं आहे.

IPL 2022: चेन्नईच्या संघाला पहिला झटका, रॉबिन उथप्पा बाद

हैदराबादविरुद्ध नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघानं रॉबिन उथप्पाच्या रुपात पहिल्या विकेट गमावला आहे. त्यानं 10 चेंडूत 15 धावा केल्या आहेत. 

CSK vs SRH : हैदराबाद अंतिम 11 

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर, शशांक सिंग, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन 

CSK vs SRH : चेन्नई अंतिम 11

रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, डी. ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महिश तीक्षणा, मुकेश चौधरी


 

CSK vs SRH : हैदराबादने निवडली गोलंदाजी

सनरायजर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे चेन्नईचे खेळाडू प्रथम फलंदाजीला येतील.

CSK vs SRH : आतापर्यंत चेन्नई विरुद्ध हैदराबाद

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आतापर्यंत 16 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये 12 वेळा चेन्नईने तर केवळ 4 वेळा हैदराबादने विजय मिळवला आहे.

CSK vs SRH : हैदराबाद संभाव्य अंतिम 11 

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समाद, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन 

CSK vs SRh : चेन्नईचे संभाव्य अंतिम 11

रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएश धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, डी. ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस


 

CSK vs SRH : दोन्ही संघाना विजयाची प्रतिक्षा

आज सामना होणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघाना पहिल्या विजयाची प्रतिक्षा असल्याने आज कोणा एकाचे विजयाचे खाते नक्कीच उघडणार आहे.

पार्श्वभूमी

CSL vs SRH, Live Updates : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा 17 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या दोघांमध्ये पार पडत आहे. हा सामना चेन्नईसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण स्पर्धेतील एक बलाढ्य संघ असूनही पहिले तीन सामने त्यांना गमवावे लागले आहेत. त्यामुळे हंगामातील पहिल्या विजयाची त्यांची प्रतिक्षा आजतरी संपणार का? याकडे चेन्नई फॅन्सचे लक्ष आहे. तर हैदराबादनेही दोन पैकी दोन सामने गमावल्याने त्यांनाही पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.  


कसा आहे पिच रिपोर्ट?


या मैदानात झालेल्या याआधीच्या दुपारच्या सामन्यात राजस्थानच्या बटलरने धमाकेदार शतक झळकालवलं होतं. त्यात सामना दुपारी असल्याने दवाची अडचणही अधिक येणार नसल्याने आज  नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची शक्यता आहे. प्रथम फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या उभी करुन समोरच्या संघावर तणाव टाकून कमी धावसंख्येत रोखण्याची रणनीती नाणेफेक जिंकणाऱ्यांची असेल.


चेन्नई अंतिम 11


रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, डी. ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महिश तीक्षणा, मुकेश चौधरी


हैदराबाद अंतिम 11 


अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर, शशांक सिंग, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.