CSK vs PBKS, IPL 2022 Live Score: पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव

 आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल.

सतिश केंगार Last Updated: 03 Apr 2022 11:20 PM
पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव

पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव

सामना सीएचकेच्या हाताबाहेर, 8 विकेट पडल्या, धोनी अजूनही मैदानात

या सामन्यात चेन्नईची अत्यंत खराब कामगिरी दिसत असून आता संघाचे 8 गाडी बाद झाले आहेत.  

पंजाबच्या गोलंदाजांची तुफान खेळी, CSKचा निम्मा संघ 36 धावांत बाद

चेन्नई सुपर किंग्जची अवस्था बिकट होत चालली आहे. सीएसकेचा निम्मा संघ अवघ्या 36 धावांवर बाद झाला. 





चेन्नई सुपर किंग्जची खराब सुरुवात, 4 विकेट गमावल्या

चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खूप खराब झाली आहे. कर्णधार रवींद्र जडेजा सोबतच चार जण बाद झाले आहेत.  जडेजाला अर्शदीप सिंगने बोल्ड केले. जडेजाला खातेही उघडता आले नाही. CSK चा स्कोअर- 27/4. अंबाती रायुडू आणि शिवम दुबे फलंदाजी करत आहेत.

फलंदाजीच्या सुरुवातीलाच CSK ला झटका, ऋतुराज-उथप्पा पॅव्हेलियनमध्ये परतले

चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का बसला आहे. रॉबिन उथप्पा झेलबाद. 2.5 षटकांत CSK ची धावसंख्या दोन विकेट्सवर 15 धावा आहे. मोईन अली आणि अंबाती रायडू मैदानावर आहेत.

पंजाबने सीएसके समोर181 धावांचे ठेवले लक्ष्य

पंजाब किंग्ज (PBKS) ने चेन्नई सुपर किंग्जला (CSK) विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 8 गडी गमावून 180 धावा केल्या.

सीएसकेचे जोरदार पुनरागमन, पंजाबचे 7 खेळाडू बाद

ओडियन स्मिथ बाद


 
पंजाबला सहावा धक्का, शाहरुख खान बाद

सीएसकेला सहावे यश मिळाले आहे. शाहरुख खानला झेलबाद. शाहरुखने संघाच्या धावसंख्येत 40 धावांचे योगदान दिले. 16 षटकांनंतर धावसंख्या - 152/6.

पंजाब किंग्जची 5वी विकेट पडली, जितेश शर्मा उथप्पाच्या हाती झेलबाद

पंजाब किंग्जची 5वी विकेट पडली. जितेश शर्मा रॉबिन उथप्पाच्या हाती झेलबाद झाला. जितेशने 26 धावांची खेळी खेळली. 14.5 षटकांनंतर धावसंख्या - 146/5.

तुफान फलंदाजीनंतर लिव्हिंगस्टोन बाद, 60 धावांची शानदार खेळी

लिव्हिंगस्टोनची झंझावाती खेळी संपली. अंबाती रायडूच्या हाती झेलबाद. लिव्हिंगस्टोनने 60 धावांची शानदार खेळी खेळली. 11.1 षटकांनंतर धावसंख्या - 115/4. जितेश शर्मा आणि शाहरुख खान फलंदाजी करत आहेत.

लिव्हिंगस्टोनचे अर्धशतक, पंजाब किंग्जच्या 100 धावा पूर्ण

पंजाब किंग्जचा फलंदाज लिव्हिंगस्टोनने अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 28 चेंडूत 54 धावा केल्या आहेत. यासोबतच पंजाबच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. 

धवन-लिव्हिंगस्टोनने सांभाळला पंजाब किंग्जचा डाव

पंजाब किंग्जकडून धवन आणि लियाम लिव्हिंगस्टोन चांगली फलंदाजी करत आहेत. संघाने 6 षटकांत 72 धावा केल्या आहेत.

पंजाबला दुसरा झटका, राजपक्षे 9 धावा करून बाद

पंजाब किंग्जला सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहे. राजपक्षे  9 धावा करून बाद झाला आहे. 

धवनसोबत फलंदाजी कर्णयातही आला भानुका राजपक्षे

मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर भानुका राजपक्षे फलंदाजीला आला आहे.

पंजाब किंग्जला पहिला धक्का, मयंक 4 धावा करून बाद

पंजाब किंग्जकडून मयंक अग्रवाल आणि शिखर धवन सलामीला आले. यादरम्यान मयंक 4 धावा करून बाद झाला आहे. मुकेश चौधरीने त्याला पॅव्हेलियनचा रास्ता दाखवला.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पंजाबनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये केले बदल 

पंजाब किंग्ज: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा

चेन्नईने प्लेइंग इलेव्हनमध्ये केले बदल

चेन्नईने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे.


चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (क), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी

चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यासाठी लवकरच नाणेफेक होणार आहे.

चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यासाठी लवकरच नाणेफेक होणार आहे.

पार्श्वभूमी

 आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल. तर पंजाबलाही पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 16 आणि पंजाबने 10 सामने जिंकले आहेत. 


चेन्नईकडे पहिला विजय मिळवण्याचं लक्ष्य



रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला आपली जुनी जादू कायम ठेवता आलेली नाही. चेन्नईच्या संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईचा संघ ज्या दमदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो तसा गोलंदाजीत दमदारपणा अद्याप पाहायला मिळालेला नाही. अशा परिस्थितीत जडेजा आणि धोनीला पुन्हा एकदा संघाच्या रणनीतीचा विचार करावा लागणार आहे.


पंजाबसाठी 'गुड न्यूज'

या सामन्यापूर्वी पंजाबसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टो संघात सामील झाला आहे. तो चेन्नईविरुद्धही मैदानात उतरण्याची शकता आहे. पंजाबसाठी सर्वात मोठी समस्या त्यांची गोलंदाजी आहे. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि ऑफस्पिनर हरप्रीत ब्रार यांना काही विशेष साध्य करता आलेले नाही. अशा स्थितीत संघालाही त्यांचे पर्याय शोधावे लागतील.


जर आपण आयपीएल 2022 च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर चेन्नई 8 व्या स्थानावर आहे. तर पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स सध्या अव्वल स्थानावर आहे. राजस्थानने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.