IPL 2022 : चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) सामन्यात हैदराबादने दमदार अशा विजयाची नोंद केली आहे. त्यांनी चेन्नईला 8 विकेट्सनी मात दिली आहे. आधी सामन्यात गोलंदाजी करत 154 धावांत चेन्नईला रोखलं. ज्यानंतर अभिषेक शर्माच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादने 17.4 षटकात चेन्नईवर 8 गडी राखून दमदार विजय मिळवला आहे.
आयपीएलच्या आजच्या सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकत हैदराबादने गोलंदाजी निवडली. हैदराबादकडून ऋतुराज आणि रॉबिनने चांगली सुरुवात केली पण उथप्पा 15 आणि ऋतुराज 16 धावा करुन तंबूत परतल्यानंतर संघ पुन्हा अडचणीत आला. ज्यानंतर मोईन अली (48) आणि रायडूने (27) अप्रतिम भागिदारी केली. अखेर जाडेजाने 23 तर ब्राव्होने नाबाद 8 धावांची खेळी केली. ख्रिस जॉर्डन नाबाद 6 तर धोनी आणि दुबे प्रत्येकी 3 धावा करण्यात यशस्वी राहिले. हैदराबादकडून सुंदर आणि नटराजनने प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर, मार्को, मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ज्यानंतर 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक आणि केन यांनी चांगल्या भागिदारीचं दर्शन घडवलं. दोघांनी 89 धावांची दमदार भागिदारी केली, केन 32 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर राहुल त्रिपाठीने नाबाद 39 धावांची साथ अभिषेकला दिली. अभिषेकने 75 धावांची दमदार खेळी केली. पूरनने नाबाद 5 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईकडून ब्राव्हो आणि मुकेशने प्रत्येकी एक विकेट घेतली. पण हैदराबादच्या दमदार फलंदाजीसमोर चेन्नईकर कमाल करु न शकल्याने चेन्नईला सलग चौथा पराभव मिळवावा लागला.
हे देखील वाचा-
- IPL 2022: गुजरातला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 19 धावांची गरज, अखेरच्या षटकात राहुल तेवतियानं कसा सामना फिरवला? पाहा व्हिडिओ
- IPL 2022: राहुल तेवतियानं सामना फिरवला, गुजरातचा 6 विकेट्सनं विजय; लियाम लिव्हिंगस्टोन आक्रमक खेळी व्यर्थ
- Shikhar Dhawan: टी-20 क्रिकेटमध्ये शिखर धवननं रचला इतिहास; विराट, रोहितलाही जमलं नाही ते त्यानं करून दाखवलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha