IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरूचा संघ मुंबईशी भिडणार आहे. या हंगामात मुंबईची सुरुवात खराब झाली आहे. मुंबईनं आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात मु्ंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, बंगळुरूच्या संघानं तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात आरसीबीचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल संघात एन्ट्री करणार आहे. मॅक्लवेलचं संघात सामील झाल्यानं आरसीबीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच मॅक्सवेलचं आरसीबीसमोर मोठं आव्हान असणार आहे. 


मुंबई आणि बंगळुरू यांच्यात आज पुण्यातील एमसीए क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे.  मुंबईविरुद्ध या सामन्यात मॅक्सवेल मैदानात खेळताना दिसणार आहे. त्यांच्या आगमनाने संघ आणखी मजबूत होईल. मॅक्सवेल फिरकी गोलंदाजी तसेच स्फोटक फलंदाजी करू शकतो. ज्यामुळं मॅक्लवेलचं मुंबईसमोर मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान, सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारलेल्या मुंबईचा संघ बंगळुरूविरुद्ध कशी कामगिरी बजावतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा अनेक खेळाडू 6 एप्रिल रोजी आयपीएल स्पर्धेशी जुडणार होते. परंतु, ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेजलवूड अजूनही संघात सामील झाला नाही. आरसीबीच्या पुढच्या सामन्यात म्हणजे चेन्नईविरुद्ध तो संघात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीच्या संघानं जोश हेजलवूडला विकतं घेतलं होतं.


बंगळुरूचा संभाव्य संघ -
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), डेव्हिड विली, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.


हे देखील वाचा-