MI vs RCB, Pitch Report : आयपीएलमधील दमदार संघ मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवण्याची संधी आज असून त्यांच्या समोर रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचं आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुर (MI vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या 18 व्या सामन्यात मुंबईला यंदाच्या हंगामातील पहिला-वहिला विजय मिळवण्याची आशा आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही सामन्यात मुंबई पराभूत झाली आहे. दुसरीकडे बंगळुरुने पहिला सामना गमावल्यानंतर त्यानंतरचे दोन्ही सामने दणक्यात जिंकत गुणतालिकेत चांगलं स्थान मिळवलं आहे.


कसा आहे पिच रिपोर्ट?


आज सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये अगदी वेगवेगळी धावसंख्या होत आहे. राजस्थान संघाने 210 धावांचा डोंगर उभारला पण नंतर झालेल्या सामन्यात 171 आणि 161 धावाच झाल्याने आज नेमकी किती धावसंख्या होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात दवाच्या अडचणीमुळे दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच अडचण येऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे.


मुंबई विरुद्ध बंगळुरु अशी असेल ड्रीम 11 (MI vs RCB Best Dream 11)


विकेटकीपर- ईशान किशन, दिनेश कार्तिक


फलंदाज- सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा/विराट कोहली, फाफ डु प्लेसीस, रोहित शर्मा


ऑलराउंडर- किरॉन पोलार्ड, वानिंदू हसरंगा,


गोलंदाज-  आकाश दीप, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha