IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात गुजरातच्या संघानं पंजाबला (PBKS Vs GT) सहा विकेट्सनं पराभूत केलं आहे. या विजयात गुजरातचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियानं (Rahul Tewatia) मोलाची भूमिका बजावली. ज्यामुळं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अखेरच्या षटकात गुजरातच्या संघाला 19 धावांची गरज होती. त्यावेळी सामना पंजाबच्या बाजूनं झुकलेला दिसत होता. परंतु, मैदानात आलेल्या राहुल तेवतियानं तीन चेंडूत 13 धावा करत गुजरातला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात गुजरात 19 धावांची गरज असताना राहुल तेवतियानं कसा सामना फिरवला?  हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात. 


गुजरात आणि पंजाब यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर शुक्रवारी खेळण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पंजाबच्या संघानं गुजरातसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात 19 धावांची गरज होती. त्यावेळी पंजाबच्या कर्णधारानं मयांक अग्रवालनं ओडियन स्मिथकडं चेंडू सोपवला. या सामन्यात पंजाब बाजी मारेल असं वाटतं असताना राहुल तेवतियानं पंजाबच्या तोंडातून विजयी खास हिसकावून घेतला. 


राहुल तेवतियानं कसा सामना फिरवला?
- ओडियन स्मिथनं अखेरच्या षटकाची सुरुवात वाईड बॉलनं केली. आता गुजरातला विजयासाठी 6 चेंडूत 19 धावांची गरज होती. 
- त्यानंतर ओडियन स्मिथनं दुसराही चेंडू वाईड टाकला, त्यावर हार्दिक पांड्या रन आऊट झाला. 
- हार्दिक बाद झाल्यावर राहुल तेवतिया मैदानात आला. त्यावेळी गुजरातला विजयासाठी 5 चेंडूत 18 धावांची आवश्यकता होती.
- दुसऱ्या चेंडूत राहुल तेवियानं एक धाव काढली. आता गुजरातला विजयासाठी 4 चेंडूत 17 धावा करायच्या होत्या.
- ओडिनच्या तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड मिलरने चौकार ठोकला. आता गुजरातला 3 चेंडूत 13 धावांची गरज होती.
- ओडिनच्या चौथ्या चेंडूवर मिलरनं फटका मारला. पण त्याला एकच धाव घेता आली. आता गुजरातला 2 चेंडूत 12 धावा करायच्या होत्या.
- अखेरच्या दोन्ही चेंडूत 12 धावांची गरज असताना राहुल तेवतियानं सलग दोन षटकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला.


व्हिडिओ-



हे देखील वाचा-