PBKS vs GT IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात गुजरातनं पंजाबला 6 विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजराजच्या संघानं पंजाबसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सामना पंजाबच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राहुल तेवतियानं अखेरच्या तीन चेंडूवर 13 धावा ठोकत गुजरातला विजय मिळवून दिलाय.
नाणेफेक गमवल्यानंतर मैदानात आलेल्या पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. पंजाबनं दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट्स गमावली. त्यानंतर जॉनी बेअरस्टोनंही स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, शिखर धवननं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. पंजाबनं दोन विकेट्स गमवल्यानंतर मैदानात आलेल्या लियान लिव्हिंगस्टोननं आक्रमक फलंदाजी करत संघाचा स्कोर पुढे नेला. परंतु, दहाव्या षटकात राशीद खाननं शिखर धवनला बाद केलं. या सामन्यात ओडियन स्मिथ मोठी धावसंख्या उभी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर सोळाव्या षटकात राशिद खानं लिव्हिंगस्टोनला आक्रमक खेळी संपुष्टात आणली. अखेरच्या दोन षटकात फलंदाजी करत राहुल चहरनं 14 बॉलमध्ये 22 धावांची खेळी केली. तर, अर्शदीप सिंहनं पाच चेंडूत दहा धावा केल्या. ज्यामुळं पंजाबनं गुजरात समोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं. गुजरातकडून राशिद खाननं सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या. तर, दर्शन नालकांडेनं दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शामी, हार्दिक पांड्या, लॉकी फॅर्ग्युसन यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स प्राप्त झाल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातच्या संघानं चौथ्याच षटकात त्यांचा पहिला विकेट्स गमावला. मात्र, त्यानंतर सलामीवीर शुभमन गिलनं आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेला. दरम्यान, साई सुधरसननं त्याला चांगली साथ दिली. मात्र, पंधराव्या षटकात राहुल चहरनं साई सुधरसनच्या रुपात गुजरातला दुसरा झटका दिला. त्यानंतर शुभमन गिलनंही आपली विकेट्स गमावल्यानंतर संपूर्ण जबाबदारी कर्णधार हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आली. परंतु, अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हार्दिकला रनआऊट करून पंजाबनं जोरदार कमबॅक केलं. पाच चेंडूत 18 धावांची गरज असताना राहुल तेवतिया मैदानात आला. हा सामना पंजाबच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना त्यानं अखेरच्या चेंडूत 13 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना त्यानं ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारले. ज्यामुळं गुजरातच्या संघानं सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. पंजाबकडून कागिसो रबाडानं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, राहुल चहरला एक विकेट्स मिळाली.
हे देखील वाचा-
- PKBS Vs GT LIVE Score Updates: गुजरातच्या संघानं पंजाबच्या तोंडून विजय हिसकावला, राहुल तेवतिया ठरला हिरो
- IPL 2022: गुजरातविरुद्ध सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनची बॅट तळपली; सर्वात जलद अर्धशतक ठोकून वेधलं सर्वांचं लक्ष
- Shikhar Dhawan: टी-20 क्रिकेटमध्ये शिखर धवननं रचला इतिहास; विराट, रोहितलाही जमलं नाही ते त्यानं करून दाखवलं