IPL 2022: आयपीएलचे पाच खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघानं यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबई आतापर्यत पाच सामने खेळले असून एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आला नाही. यावर मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) मुंबईच्या प्रदर्शनाबाबत मोठं वक्तव्य केलंय.  मुंबईचा संघ सध्या कठीण काळातून जात आहे. आगामी हंगामात संघाला चांगले निकाल मिळतील, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. 


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघाला पहिल्या पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. ज्यामुळं मुंबईचा प्लेऑफच्या शर्यतीपासून दूर होत असल्याचं दिसत आहे. मुंबईला उर्वरित 9 पैकी किमान 8 सामने जिंकणे आवश्यक आहे.


"मुंबई इंडियन्स चॅम्पियन संघ आहे आणि नेहमीच चॅम्पियन संघ असेल. केवळ काही सामन्यांची गोष्ट आहे. जे खेळाडू संघात सामील झाले आहेत, ते खरोखरंच चांगली कामगिरी करत आहेत. मला त्यांच्यासाठी आनंद होत आहे. ज्यात तिलक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्या सामन्यापासून दोघेही जबाबदारीनं खेळत आहेत.  मला खात्री आहे की भविष्यात चांगले खेळाडू म्हणून चमकतील. क्रिकेटमध्ये जय-पराजय असतो. पण एक गोष्ट आम्ही अजूनही सोडलेली नाही, ती म्हणजे कठोर परिश्रम करणे आणि एकमेकांच्या सोबत उभे राहणे. ते खूप महत्वाचं आहे. हे आमच्या संघाचं ध्येय आहे आणि आम्ही त्यावर कायम राहिलो तर सर्व काही चांगले होईल.”


मुंबईचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी, फॅबियन अॅलन, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, रिले मेरेडिथ , अनमोलप्रीत सिंग, संजय यादव, रमणदीप सिंग, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान, अर्जुन तेंडुलकर.


हे देखील वाचा-