IPL 2022:  आयपीएल 2022 मध्ये पाच पैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवणाऱ्या चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर (Deepak Chahar) पाठीच्या दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान दीपकच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या क्वाड्रिसेप्स स्नायूंना दुखापत झाली होती. पुनर्वसनासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला. पायाची दुखापत बरी होत होती, पण त्यानंतर दीपकच्या पाठीला दुखापत झाली. दिपक चहरचं आयपीएलमधून बाहेर पडल्यानं त्याच्या ऐवजी कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचं? असा प्रश्न चेन्नईच्या संघासमोर उपस्थित होत आहे. 


आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईनं दीपक चाहरला 14 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तो आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. दरम्यान, दीपक चहर मागील अनेक दिवसांपासून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. ज्यामुळं त्याला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावं लागलंय. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पाठीचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं यंदाच्या हंगामात तो खेळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातंय. दीपक चहर मागील अनेक दिवसांपासून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. दीपक चाहरचं आयपीएलमधून बाहेर जाणं चेन्नईच्या संघासाठी मोठा धक्का असेल. 


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नईच्या संघ कठीण टप्प्यातून जात आहे.  चेन्नईनं आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. चेन्नईच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे कमकुवत गोलंदाजी. अशा परिस्थितीत चेन्नईला आपला स्टार गोलंदाज दीपक चहरची खूप उणीव भासत होती. 


हे देखील वाचा-