IPL 2022 Closing Ceremony : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर 29 मे रोजी आयपीएल 2022 चा अंतिम सामना होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आधीच फायनलमध्ये पोहचलाय. तर राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहचणार आहे. IPL 2022 चा समारोप दिमाखात होणार आहे. फायनलचा सामना सुरु होण्याआधी एक दमदार कार्यक्रमाचं आयोजन (IPL 2022 closing ceremony) करण्यात येणार असून अनेक तारे-तारका यावेळी त्याठिकाणी अवतरतील. यामध्ये सुपरस्टार रणवीर सिंहसह (Ranveer Singh) संगीतकार ए.आर. रहमान (AR Rehman) तसचं क्रिकेट जगतातील मोठमोठ्या हस्तींचा समावेश असणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती - 
यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. त्यामुळे 29 मे रोजी अनेक मान्यवर येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याठिकाणी तब्बल 6 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.


आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. आयपीएलचा क्लोजिंग समारोप 29 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे. हा कार्यक्रम 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता...  


2018 मध्ये झालं होतं अखेरचं आयोजन
आयपीएलचा यंदाचा 15 वा हंगाम आहे. दरवर्षी आय़पीएलची सुरुवात तसंच सांगता दणक्यात पार पडत असते. पण मागील काही वर्षे कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलमध्ये असे कार्यक्रम होत नव्हते. अखेर 2018 मध्ये एक दमदार सांगता कार्यक्रम झाला होता. त्यानंतर आता यंदा एक मोठ्या समारंभाचे आयोजन होणार आहे. यंदाच्या आयोजनावेळी बीसीसीआय (BCCI) भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या उत्सवाचा अनोखं सेलिब्रेशन करणार आहेत. मागील काही वर्षात आयोजन झालं नसल्याने यंदा एक दमदार कार्यक्रम बीसीसीआय आयोजित कऱणार आहे.


पुढील हंगामापासून वेळेत बदल - 
बुधवारी बीसीसीआयने आयपीएल 2023 बाबात मोठी घोषणा केली होती. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, संभावित ब्रॉडकास्टरला सामना सायंकाळी आठ वाजता सुरु होणार असल्याचे सांगितलेय. तर दुपारचा सामना सांयकाळी चार वाजता सुरु होणार असल्याचे सांगण्यात आलेय. तसेच 16 व्या हंगामात डबल हेडर सामने कमी असतील, याचा विचार करण्यात येणार आहे.