Proposal In IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात सामना झाला. जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा डाव सुरू होता, त्यावेळी मैदानावर असे काही घडले की, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. येथे एका मुलीने भर स्टेडियममध्ये सर्वांच्या देखत आपल्या प्रियकराला प्रपोज केलं. 


चेन्नई सुपर किंग्जच्या डावाचे 11 वे षटक सुरू होते, त्यावेळी टीव्हीच्या पडद्यावर ही जोडी झळकली आणि सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. यावेळी एक मुलगी गुडघ्यावर बसली आणि तिने प्रियकराला प्रपोज केला. मुलीने प्रपोज केल्यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली.


या मुलाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची जर्सी घातली होती आणि मुलीनेही लाल रंगाचा ड्रेस घातला होता. मुलीने मुलाला प्रपोज केल्यावर मैदानात उपस्थित लोकांनी मोठ्याने आवाज करत आणि टाळ्या वाजवत या दोघांचे अभिनंदन केले. दरम्यान, आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.






दरम्यान, आयपीएलच्या सामन्यात मैदानावर अशी घटना घडल्याची ही पहिलीच वेळ नाही. केवळ प्रेक्षकच नाही तर खेळाडूंनीही असा प्रपोज याआधी मैदानात केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू दीपक चहरने गेल्या वर्षी मैदानावरच सामना संपल्यानंतर लगेचच आपल्या मैत्रिणीला प्रपोज केला होता. आयपीएल संपल्यानंतरच दोघांची एंगेजमेंट झाली.


इतर महत्वाच्या बातम्या: