IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज जोश फिलिप आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून बाहेर पडला आहे. विराट कोहलीच्या संघानेही फिलिपच्या बदलाची घोषणा केली आहे. या हंगामात जोश फिलिपची जागा न्यूझीलंडचा अनकॅप्ड खेळाडू फिन अॅलन घेणार आहे.
मागील हंगामाच्या आधीच जोश फिलिपला आरसीबीने आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं होतं. गेल्यावर्षी जोश फिलिपला पाच सामने खेळण्याची संधी मिळाली होता. या पाच सामन्यात त्याने 78 धावा केल्या. जोश फिलिपला नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध टी -20 मालिकेत पदार्पण करण्याची संधीही मिळाली. पण वैयक्तिक कारणांमुळे जोश फिलिपला आयपीएल 14 मधून बाहेर पडावे लागले आहे.
IPL 2021 | विराट कोहलीच्या नेतृत्त्वात RCB विजयी होणार? पाहा सीझनचं संपूर्ण शेड्यूल
फिन एलनला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आरसीबीने संघात स्थान दिले आहे. 21 वर्षीय फिन अॅलनने न्यूझीलंड संघात अद्याप पदार्पण केले नाही. परंतु नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडच्या स्थानिक स्पर्धेत फिन अॅलन उत्कृष्ट फॉर्मात होता. अॅलनने 11 सामन्यात 56.9 च्या सरासरीने 512 धावा केल्या.
अॅलन विकेटकीपरच्या भूमिकेत दिसणार
या हंगामात जोश फिलिप आरसीबीचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळणार होता. आता फिन अॅलन या भूमिकेत दिसणार आहे. मात्र अॅलनला किती सामने खेळण्याची संधी मिळेल याबद्दल काही सांगता येणार नाही. कारण एबी डिव्हिलियर्सदेखील यष्टीरक्षकांची भूमिका निभावू शकतो. आरसीबीला या हंगामात प्रथमच विजेतेपद मिळण्याची आशा आहे. विराट कोहलीचा संघ आपला पहिला सामना 9 एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं संपूर्ण शेड्यूल (IPL 2021 Royal Challengers Bangalore Full Schedule)
- 9 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 14 एप्रिल, बुधवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 18 एप्रिल, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
- 22 एप्रिल, गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- 25 एप्रिल, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी मुंबई : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 27 एप्रिल, मंगळवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 30 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 3 मे, सोमवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 6 मे, गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स
- 9 मे, रविवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- 14 मे, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- 16 मे, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 20 मे, गुरुवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियंस
- 23 मे, रविवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स