IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चं 14वं सीझन म्हणजेच, आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. तसेच 30 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 14व्या सीझनचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार असून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येणार आहे. तसचे आयपीएल 2021 चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 30 मे खेळवण्यात येणार आहे.
गेल्या सीझनमधील चॅम्पियन मुंबई इंडियन्स 9 एप्रिल रोजी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरोधात आगामी सीझनचा पहिला सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येईल. आयपीएल 2021 मध्ये एकूण 11 डबल हेडर्स सामने खेळवण्यात येतील. जिथे सहा संघ दुपारी तीन सामने आणि दोन संघ दुपारी दोन सामने खेळतील. दुपारी होणारे सामने साडेतीन वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होतील.
RCB ने लिलावात खरेदी केले आठ खेळाडू
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2021च्या लिलावात एकूण आठ नवे खेळाडूंवर बोली लावून त्यांचा आपल्या संघात समावेश करुन घेतला आहे. आरसीबीने लिलावात ग्लेन मॅक्सवेल (14.25 कोटी रुपये), सचिन बेबी (20 लाख रुपये), रजत पाटीदार (20 लाख रुपये), मोहम्मद अजहरुद्दीन (20 लाख रुपये), काइल जॅमीसन (15 कोटी रुपये), डॅनियल क्रिश्चियन (4.80 कोटी रुपये), सुयश प्रभुदेसाई (20 लाख रुपये) आणि केएस भारत (20 लाख रुपये) खरेदी केलं आहे.
यंदाच्या सीझनसाठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ : (Royal Challengers Bangalore Full Squad)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जोश फिलिप (विकेटकीपर), एबी डिविलियर्स (विकेटकीपर), पवन देशपांडे, वाशिंगटन सुंदर, डेनियल सॅम्स, युजवेंद्र चहल, एडम जॅम्पा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, काइल जॅमीसन, डॅनियल क्रिश्चियन, सुयश प्रभुदेसाई आणि केएस भारत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं संपूर्ण शेड्यूल (IPL 2021 Royal Challengers Bangalore Full Schedule)
9 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
14 एप्रिल, बुधवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
18 एप्रिल, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
22 एप्रिल, गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स
25 एप्रिल, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी मुंबई : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
27 एप्रिल, मंगळवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
30 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
3 मे, सोमवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
6 मे, गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स
9 मे, रविवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
14 मे, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
16 मे, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
20 मे, गुरुवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियंस
23 मे, रविवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
महत्त्वाच्या इतर बातम्या :