IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चं 14वं सीझन म्हणजेच, आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. तसेच 30 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 14व्या सीझनचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार असून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येणार आहे. तसचे आयपीएल 2021 चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 30 मे खेळवण्यात येणार आहे.


गेल्या सीझनमधील चॅम्पियन मुंबई इंडियन्स 9 एप्रिल रोजी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरोधात आगामी सीझनचा पहिला सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येईल. आयपीएल 2021 मध्ये एकूण 11 डबल हेडर्स सामने खेळवण्यात येतील. जिथे सहा संघ दुपारी तीन सामने आणि दोन संघ दुपारी दोन सामने खेळतील. दुपारी होणारे सामने साडेतीन वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होतील.


मुंबई इंडियन्सने लिलावात खरेदी केले सात खेळाडू


दरम्यान, मुंबई इंडियन्सने आयपीएल 2021 च्या लिलावात एकूण सात खेळाडू खरेदी केले होते. मुंबईने एडम मिल्ने (3.20 कोटी रुपये), नाथन कुल्टर नाइल (पाच कोटी रुपये), पीयुष चावला (2.20 कोटी रुपये), युद्धवीर चरक (20 लाख रुपये), मार्को जॅनसन (20 लाख रुपये), अर्जुन तेंडुलकर (20 लाख रुपये) आणि जेम्स नीशम (50 लाख रुपये) यांना खरेदी केलं आहे.


यंदाच्या सीझनसाठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ :


मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, आदित्‍य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेंट बोल्‍ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कीरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, क्रिस लिन, राहुल चाहर, हार्दिक पंड्या, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, अनुकूल रॉय, इशान किशन, नाथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, युद्धवीर चरक, मार्को जैनसन, अर्जुन तेंडुलकर आणि जिमी नीशम.


मुंबई इंडियन्सचं संपूर्ण शेड्यूल (IPL 2021 Mumbai Indians Full Schedule Squad)


9 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू


13 एप्रिल, मंगळवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : कोलकाता नाईट राइडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स


17 एप्रिल, शनिवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद


20 एप्रिल, मंगळवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स


23 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स


29 एप्रिल, गुरुवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स


1 मे, शनिवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स


4 मे, मंगळवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स


8 मे, शनिवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स


10 मे, सोमवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, बेंगळुरू : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स


13 मे, गुरुवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, बंगळुरू : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स


16 मे, रविवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, बंगळुरू : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स


20 मई, गुरुवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स


23 मे, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, कोलकाता : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स


महत्त्वाच्या इतर बातम्या :