IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून पाच सामन्यांच्या टी20 सीरिजची सुरुवात होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. लेग स्पिनर वरूण चक्रवर्ती फिटनेस टेस्ट पास होऊ शकला नाही. तर वेगवान गोलंदाज टी नटराजनही या सरीजमध्ये खेळू शकले की, नाही हा प्रश्न आहे. रिपोर्ट्सनुसार, लेग स्पिनर राहुल चाहरला शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या टी20 सीरिजमध्ये वरूण चक्रवर्तीसाठी रिप्लेसमेंट म्हणून टीम इंडियामध्ये सहभागी करण्यात येणार आहे.
वरूण बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीमध्ये सलगच्या फिटनेस्ट टेस्ट नापास झाला आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "वरूण चक्रवर्तीचा संघात समावेश करण्यात आला होता कारण त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीतून तो सावरला होता. याच दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मात्र वरूण जाऊ शकला नव्हता. त्याने एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन पूर्ण केलं होतं."
परंतु, वरूण चक्रवर्ती यो यो टेस्ट आणि दोन किलोमीटरच्या दूरवरची फिटनेस टेस्ट पास करण्यात अयशस्वी ठरला. आता राहुल चाहरला वरूण चक्रवर्तीची रिप्लेसमेंट म्हणून संघात सहभागी केलं जाऊ शकतं. राहुल चाहर टेस्ट सीरिजच्या सुरुवातीपासूनच टीम इंडियासोबत बायोबबलमध्ये आहे. राहुल चाहरची निवड इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठीही करण्यात आली होती.
नटराजन आणि तेवतिया यांच्यावरही प्रश्न
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियासाठी पर्वणी ठरलेला गोलंदाज टी नटराजनच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नटराजन टी20 सीरिजचे पहिले दोन सामने खेळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. नटराजन इंग्लंड विरुद्धच्या टी20 सीरीजमध्ये किती सामने खेळू शकेल याबाबतही कोणतीच स्पष्टता नाही.
या दोघांव्यतिरिक्त राहुल तेवतियाही टी20 सीरिज खेळणार की, नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. रिपोर्ट्सनुसार, राहुल तेवतियाही फिटनेस टेस्ट पास करण्यात अयशस्वी ठरल्याची माहिती समोर आली आहे. राहुल तेवतिया दरम्यान टीम इंडियासोबत अहमदाबादमध्ये ट्रेनिंग करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या : .
- India Legends vs England Legends : सामना हरलो पण मनं जिंकली, इरफान, गोनीची धडाकेबाजी खेळी
- तुफानी फटकेबाजी करत पृथ्वी शॉनं मोडला विराट, धोनीचा विक्रम
- Mitali Raj Records: मिताली राजची अनोख्या विक्रमला गवसणी; श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला टाकलं मागे