IPL 2021 | आयपीएल 2021 चा 11 वा सामना दिल्ली आणि पंजाब  यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून रंगणार आहे. मागील दोन्ही सामन्यात दोन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत दोन्ही संघ विजयीच्या शोधात आहेत. दिल्लीला राजस्थानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर पंजाबचा चेन्नईने पराभव केला. मात्र दोन्ही संघांनी विजयासह आपली सुरुवात केली आहे.


दोन्ही सामन्यात पंजाबची गोलंदाजी खूपच खराब झाली होती. अशा परिस्थितीत कर्णधार केएल राहुल दिल्लीविरूद्ध गोलंदाजीत काही बदल करु शकतो. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रिले मेरेडिथ आपल्या गोलंदाजीने फारशी छाप पाडू शकला नाही. अशा परिस्थितीत इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनला आज संधी मिळू शकेल. त्याचबरोबर लेगस्पिनर म्हणून  रवी बिश्नोईला मुरुगन अश्विनच्या जागी शेवटच्या अकरामध्ये स्थान मिळू शकतं.


तर दिल्लीच्या संघातही एक बदल होऊ शकतो. मागील हंगामातील वेगवान स्टार गोलंदाज एरिक नॉर्टजे तंदुरुस्त असून संघात सामील झाला आहे. अशा परिस्थितीत टॉम करनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होऊ शकतो.


खेळपट्टीचा अहवाल


मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. अशा परिस्थितीत येथे उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो. सामना संध्याकाळी सुरू होत असल्याने दव येथे मोठी भूमिका साकारेल.अशा परिस्थितीत टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.


दिलीचा संभाव्य संघ : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, ख्रिस वॉक्स, आर अश्विन, अमित मिश्रा, एरिक नॉर्टजे आणि कागिसो रबाडा. 


पंजाबचा संभाव्य संघ : केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, झाय रिचर्डसन, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.