IPL 2021: आयपीएल 2021 दरम्यान चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी आली आहे. संघाचे संचालक आणि अध्यक्ष एल सबरत्नम यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूची माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली आहे.


सबरत्नम यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी आहे. सबारत्नम बराच काळ चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक होते. याआधी ते चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संचालक देखील होते. ते सबारत्नम इंडिया सिमेंट्सचे सल्लागार आणि कोरोमंडल शुगर्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते.


या मोसमात चेन्नईने शानदार पुनरागमन
विशेष म्हणजे गेल्या वर्षी युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब होती. संघ लीगच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफसाठी पात्र होऊ शकला नाही. मात्र, या मोसमात संघाने शानदार पुनरागमन केले आहे. या मोसमातील पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईने सलग चार सामने जिंकले आहेत.


चेन्नईचा पुढील सामना हैदराबादशी
चेन्नईचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 28 एप्रिलला आहे. टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या मोसमातील चेन्नईने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. तसेच, त्यांचा नेट रन रेटही सर्व संघांमधील सर्वोत्तम आहे.