IPL 2021 | ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करणार नसल्याचं म्हटलं आहे. मुंबई फलंदाज ख्रिस लिनने आयपीएलनंतर खेळाडूंच्या परतीच्या प्रवासासाठी खास विमानांची व्यवस्था करण्याविषयी बोललं होते. त्यानंतर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचं हे वक्तव्य आलं आहे. आजपासून ऑस्ट्रेलियाने भारतीय प्रवासी विमानांवर बंदी घातली आहे.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की, सर्व क्रिकेटपटू खाजगी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात गेले आहेत. ते कोणत्याही ऑस्ट्रेलियन दौर्याचा भाग नाहीत. त्यामुळे तेथे त्यांच्याकडे ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत, त्या खेळाडूंना फक्त त्यांचा वापर करून घरी परत जावे लागेल.
IPL 2021 | कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भयभीत, अनेकांची आयपीएल सोडण्याची इच्छा
काय म्हणाला होता क्रिस लिन?
मुंबईचा फलंदाज ख्रिस लिनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे (सीए) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संपल्यानंतर खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे आतापर्यंत तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि अॅडम जंपा यांनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी आयपीएलमध्ये आपल्या खेळाडूंच्या आरोग्याच्या आणि प्रवासाच्या व्यवस्थेची माहिती घेतली.
'भीतीदायक कोरोना तरीही IPL सुरु, भारताला माझ्या शुभेच्छा' गिलख्रिस्टच्या ट्वीटची चर्चा
ख्रिस लिनने न्यूज कॉर्प मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आमच्याकडून प्रत्येक आयपीएल कराराचा दहा टक्के घेते. त्यामुळे मी त्यांना विनंती केली आहे की यावर्षी आयपीएल संपल्यानंतर ही रक्कम विशेष विमानासाठी खर्च करावी. जेणेकरून आम्ही सहज घरी परत येऊ.