IPL 2021 | आयपीएल 2021 मधील 22 वा सामना आज दिल्ली आणि बंगलोर यांच्यात खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये प्रथम स्थान मिळण्याची संधी आहे. शेवटच्या सामन्यात चेन्नईच्या हातून बंगलोरला पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. या स्पर्धेत हा बंगलोरचा पहिला पराभव होता. त्याच वेळी दिल्लीने शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली होती.


युवा कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली संघ यंदा शानदार प्रदर्शन करत आहे. संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे दिल्लीला चांगली सुरुवात गेल्या सामन्यांमध्ये मिळाली आहे, याच कामगिरीची अपेक्षा त्यांना या सामन्यातही आहे. मधल्या फळीत स्टीव्ह स्मिथच्या उपस्थितीने संघाला बळकटी मिळाली आहे. त्याचबरोबर ऋ षभ पंत, शिमरन हेटमायर आणि मार्कस स्टॉइनिस आपल्या वेगवान फलंदाजीमुळे कोणत्याही वेळी सामना फिरवू शकतात. गोलंदाजीत कागिसो रबाडा हळू हळू त्याच्या लयीत परतला आहे. युवा गोलंदाज आवेश खाननेही यंदा आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. अशा परिस्थितीत अखेरच्या सामन्यात सुपर ओव्हर टाकणार्‍या अक्षर पटेल आणि मध्यमगती षटकांत अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा यांच्यावर विकेट घेण्याची जबाबदारी असेल.


आरसीबीच्या सलामीवीरांवर महत्त्वाची जबाबदारी


आरसीबीच्या फलंदाजांनी शेवटचा सामना वगळता सर्व सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पड्डिकल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. पड्डिकलने या स्पर्धेत शतकही ठोकलं आहे. मॅक्सवेलने आतापर्यंत तुफान फटकेबाजी करत चांगली कामगिरी केली आहे. त्याच वेळी, एबी डिव्हिलियर्समध्ये कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकण्याची क्षमता आहे. या सामन्यात संघाने आपले वेगवान गोलंदाज काइल जेमसन आणि मोहम्मद सिराज यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीची अपेक्षा आहे. जडेजाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात शेवटच्या षटकात 37 देणारा हर्षल पटेल नक्कीच निराश असेल. मात्र, ते एक षटक वगळता आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये त्याचे प्रदर्शन चांगलं आहे. अखेरच्या सामन्यात नवदीप सैनीने फारशी प्रभावी कामगिरी केली नाही, तरीही संघ त्याला आणखी एक संधी देऊ शकतो. फिरकी विभागात युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर हे संघाचे दोन आघाडीचे गोलंदाज असू शकतात.


पिच रिपोर्ट


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल पंजाब आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात फलंदाजी तितकीशी सोपी दिसत नव्हती. हळू खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांविरुद्ध धावा करणे सोपे नाही. तसेच या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते. पुन्हा रात्रीच्या सामन्यात दव महत्त्वाची भूमिका निभावतील. नाणेफेक जिंकणार्‍या संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल. 


संभाव्य दिल्ली संघ : पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, कगिसो रबाडा, ललित यादव, आवेश खान, अमित मिश्रा.


संभाव्य बंगलोर संघ :  विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डिकल, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल क्रिस्टन, वॉशिंग्टन सुंदर, काइल जॅमसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.