IPL 2020 SRH Schedule : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनला उद्या सुरुवात होणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचं आयोजन इतिहासात पहिल्यांदाच भारताबाहेर दुबईत करण्यात येणार आहे. 13व्या सीझनमध्ये आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्यांदा या किताबावर नाव कोरण्यास सज्ज आहे. या प्रयत्नात संघाची कमान 2016 रोजी विजेतेपद पटकावणाऱ्या डेविड वार्नरच्या हातात आहे.

कर्णधारा पदाची जबाबदारी डेविड वार्नरच्या हाती

दोन वर्षांनी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी पुन्हा एकदा विड वार्नरकडे सोपावण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतली आहे. डेविड वॉर्नरला 2018 मध्ये बॉल टेंपरिंग प्रकरणातील विवादांमुळे संघाचं कर्णधार पद गमवावं लागलं होतं. परंतु, गेल्या सीझनमध्ये वॉर्नरने जबरदस्त खेळी करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. 2016मध्ये वॉर्नर कर्णधार असताना सनरायझर्स हैदराबादने विजेतेपटाचा मान मिळवला होता.

क्रमांकसंघतारीखवेळठिकाण
1सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू21 सप्टेंबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई
2सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स26 सप्टेंबर, 2020संध्याकाळ 7:30अबू धाबी
3सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स29 सप्टेंबर, 2020संध्याकाळ 7:30अबू धाबी
4सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स02 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई
5सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियंस04 ऑक्टोबर, 2020दुपारी 3:30शारजाह
6सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेवन पंजाब08 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई
7सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स11 ऑक्टोबर, 2020दुपारी 3:30दुबई
8सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स13 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई
9सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स18 ऑक्टोबर, 2020दुपारी 3:30अबू धाबी
10सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स23 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई
11किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद24 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई
12सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स27 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई
13सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू31 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30शारजाह
14सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियंस03 नोव्हेंबर, 2020संध्याकाळ 7:30शारजाह

सनरायजर्स हैदराबादसाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेविड वॉर्नर गेल्या सीझनमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. वॉर्नर यावर्षीही कमाल करू शकतो. टी20 क्रिकेटच्या 282 सामन्यांमध्ये आठ शतक ठोकत 9 हजार 276 धावा करणारा वॉर्नर यावर्षी टी20मध्ये आपल्या 10 हजार धावा पूर्ण करू शकतो. आयपीएलच्या 126 सामन्यांमध्ये वॉर्नरच्या नावावर 142.39 चा स्ट्राइक रेटसह 4,706 धावा आहेत. यामध्ये चार शतकं आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने शिखर धवनला संघात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादकडे मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर यांसारखे खेळाडू आहेत. तर राशिद खान, बेयरस्टो आणि केन विलियमसन यांसारखे विदेशी खेळाडू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :