IPL 2020 KKR Schedule | इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनचं बिगुल वाजलं आहे. उद्या, 19 सप्टेंबरपासून दुबईत आयपीएलचा सोहळा रंगणार आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या 6 महिन्यांपासून आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. अखेर या सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्यांदाच आयपीएलचा सोहळा भारताबाहेर खेळवण्यात येणार आहे. कोलकत्ता नाइट रायडर्सने या सीझनसाठी दिनेश कार्तिकच्या हाती नेतृत्त्वाची जबाबदारी सोपावली आहे. संघाला अपेक्षा आहे की, दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वात पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा कोलकत्ता नाइट रायडर विजेते पद आपल्या नावे करण्यास यशस्वी होईल.

यंदाच्या सीझनमध्ये शाहरुख खानची टीम कोलकत्ता नाइट रायडर्सचा पहिला सामना 23 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी दुबईतील मैदानावर लीग राउंडचा आपला शेवटचा सामना संघ खेळणार आहे.

कोलकाता नाइट राइडर्स का शेड्यूल :

क्रमांकसंघतारीखवेळठिकाण
1कोलकाता नाइट रायडर वि. मुंबई इंडियंस23 सप्टेंबर, 2020संध्याकाळ 7:30अबू धाबी
2कोलकाता नाइट रायडर वि.  सनरायजर्स हैदराबाद26 सप्टेंबर, 2020संध्याकाळ 7:30अबू धाबी
3कोलकाता नाइट रायडर वि.  राजस्थान रॉयल्स30 सप्टेंबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई
4कोलकाता नाइट रायडर वि.  दिल्ली कॅपिटल्स03 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30शारजाह
5कोलकाता नाइट रायडर वि.  चेन्नई सुपर किंग्स07 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30अबू धाबी
6कोलकाता नाइट रायडर वि.  किंग्स इलेवन पंजाब10 ऑक्टोबर, 2020दुपारी 3:30अबू धाबी
7कोलकाता नाइट रायडर वि.  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू12 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30शारजाह
8कोलकाता नाइट रायडर वि.  मुंबई इंडियंस16 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30अबू धाबी
9कोलकाता नाइट रायडर वि.  सनरायजर्स हैदराबाद18 ऑक्टोबर, 2020दुपारी 3:30अबू धाबी
10कोलकाता नाइट रायडर वि.  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू21 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30अबू धाबी
11कोलकाता नाइट रायडर वि.  दिल्ली कॅपिटल्स24 ऑक्टोबर, 2020दुपारी 3:30अबू धाबी
12कोलकाता नाइट रायडर वि.  किंग्स इलेवन पंजाब26 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30शारजाह
13कोलकाता नाइट रायडर वि.  चेन्नई सुपर किंग्स29 ऑक्टोबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई
14कोलकाता नाइट रायडर वि.  राजस्थान रॉयल्स01 नोव्हेंबर, 2020संध्याकाळ 7:30दुबई

पॅट कमिंससाठी लिलावात मोजले 15.50 कोटी रुपये

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारा वेगवान गोलंदाज आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला कोलकत्ता नाईट रायडर्सने आयपीएल 2020 च्या लिलावात 15.50 कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतलं आहे. टी20 क्रिकेटमधील 82 सामन्यांत 97 विकेट्स घेणाऱ्या कमिंस दुबई आयपीएल गाजवू शकतो.

केकेआरच्या संघात पॅट कमिंस, आंद्रे रसेल यांच्यासोबतच शुभमन गिल आणि राणा यांसारखे युवा खेळाडूही आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :