IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगमधील 20व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. मुंबईच्या विजयामध्ये गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका निभावली. तसेच राजस्थानला 18.1 ओव्हर्समध्ये केवळ 136 धावांवर बाद केलं. जसप्रीत बुमराहने चार ओव्हर्समध्ये 20 धावा देत चार विकेट्स घेतले. तर बोल्टने चार ओव्हर्समध्ये 26 धावा देत दोन विकेट्स घेतले.


मुंबई इंडियन्ससाठी या सामन्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, जसप्रीत बुमराह आपल्या फॉर्ममध्ये परतला. जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्या ओव्हरमध्येच आपली खेळी दाखवण्यास सुरुवात केली होती. बुमराहने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूंवर स्मिथला माघारी पाठवलं. त्यानंतर बुमराहने तेवतिया आणि श्रेयस गोपाळला बाद करत राजस्थानला जवळपास पराभवाच्या जवळचं नेऊन ठेवलं. सर्वात शेवटी बुमराहने मुंबईवर भारी पडणाऱ्या आर्चरला 24 धावांवर बाद केलं.


बोल्टने राजस्थानच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूंवर गोलंदाज यशस्वीला शून्य धावांवर आऊट केलं. बोल्टने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये संजू सॅमसनला आऊट केलं आणि राजस्थानला सर्वात मोठा धक्का दिला.





पर्पल कॅपचे प्रबळ दावेदार


बुमराह आणि बोल्टच्या शानदार खेळीनंतर पर्पल कॅपच्या शर्यती आणखी अटीतटीची होणार आहे. रबाडा पाच सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्यामुळे सध्या पर्पल कॅप होल्डर बनला आहे. तसेच बोल्टने 6 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेत दुसऱ्या स्थानी आणि बुमराह आता 6 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, बोल्टचा इकोनॉमी रेट बुमराहपेक्षा अधिक आहे.





मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार स्मिथला दणका, 12 लाखांचा दंड


इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात राजस्थान रॉयल्सने चांगली सुरुवात केली होती, परंतु दोन सामने जिंकल्यानंतर संघ सलग तीन राजस्थानने गमावले आहेत. मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी स्मिथला 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.


इंडियन प्रीमियर लीगने एक निवेदन जारी करून स्मिथला दंडाची माहिती दिली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला अबूधाबी येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओवर रेटसाठी दोषी ठरल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचं आयपीएलकडून सांगण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :