RR vs MI IPL 2020 : बेन स्टोक्सने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थानने मुंबईवर 8 गडी राखून विजय मिळवला. बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. राजस्थानच्या या विजयामुळे प्ले ऑफमध्ये जाण्याचे आव्हान कायम राहिलंय, मात्र, चेन्नईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.


मुंबईने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवातही डळमळीत झाली. जेम्स पॅटिन्सनने रॉबिन उथप्पा (13) आणि स्टीव्ह स्मिथ (11) या दोघांना लवकर तंबू दाखवला. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने यांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. स्टोक्सने 60 चेंडूत 14 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारासह नाबाद 107 धावा केल्या. तर संजून सॅमसनने 31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा करत स्टोक्सला उत्तम साथ दिली.


RCB vs CSK : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीला फलंदाजांचीही साथ; चेन्नईची बंगलोरवर आठ विकेट्सनी मात


तत्पूर्वी, फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाची राजस्थानविरुद्ध सामन्यात खराब सुरुवात झाली. धडाकेबाज खेळी करणारा क्विंटन डी-कॉक जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी रचली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 83 भागांची झाली. ही जोडी मैदानावर तळ ठोकणार असं वाटत असतानाच कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर इशान किशन विकेट गमावली. त्याने 37 धावा केल्या. यानंतर मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली.


सूर्यकुमार यादव, कर्णधार कायरन पोलार्ड हे ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये मुंबईची धावगती मंदावली. अखेरच्या षटकांमध्ये सौरभ तिवारी आणि हार्दिक पांड्याने धावसंख्येला वेग आणला. अंकीत राजपूत आणि इतर गोलंदाजांना लक्ष्य करत मुंबईच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत धावांची वसुली केली. सौरभ तिवारी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला, त्याने 25 चेंडूत 34 धावांची खेळी केली. यानंतर पांड्या बंधूंनी कार्तिक त्यागीच्या अखेरच्या षटकात फटकेबाजी करत मुंबईला 195 आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली.