IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर - रेटसाठी ठोठावला आहे. पंजाब विरूद्धच्या सामन्यात बंगलोरचा दारूण पराभव झाला. विराटच्या संघाला 97 रन्सनी पराभवाचा सामना करावा लागला. एवढचं नाहीतर कर्णधार म्हणून विराटनेही फारशी चांगली कामगिरी केली नाही. कर्णधार म्हणून विराटची रणनीती कालच्या सामन्यात फारशी चांगली नव्हती.
आयपीएलने प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, 'या सीझनमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची ही पहिली चूक होती म्हणून आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत मिनिमम ओव्हर रेटसाठी विराट कोहलीला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.' असं म्हणावं लागेल की, कालचा दिवस विराट कोहलीसाठी फारसा चांगला नव्हता. कालच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या पंजाबमधील के. एल. राहुलने लगावलेले दोन सोपे कॅचही विराटने सोडले. विराटचीच ही चूक बंगलोरला महागात पडल्याचं बोलंलं जात आहे.
दोन वेळा सोडला के. एल. राहुलचा कॅच
किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यात केएल राहुलने 69 बॉल्समध्ये 132 रन्स काढले आणि त्याचसोबत काही नवे रेकॉर्ड्सही केले आहेत. तसेच आयपीएलमध्ये सर्वात कमी बॉल्समध्ये सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू बनला. कोहलीने राहुलचा दोन वेळा कॅच सोडला. पहिल्यांदा 17 व्या ओव्हरमध्ये डीप स्क्वेएर लेगवर जेव्हा राहुल 83 वर खेळत होता आणि त्यानंतर जेव्हा 18व्या ओव्हरमध्ये 89 वर खेळत होता तेव्हा, अशा दोन्ही वेळा कोहलीने केएल राहुलचा कॅच सोडला. त्यामुळे पंजाबचा संघ अवघे तीन विकेट्स गमावत 206 रन्सपर्यंत पोहचला.
मॅच हरल्यानंतर काय म्हणाला विराट
मॅच संपल्यानंतर विराट कोहलीने स्लो ओव्हर-रेटसंदर्भात बोलताना सांगितले की, 'मला समोर उभं राहावं लागेल आणि ही शिक्षा भोगावी लागेल, हा दिवस चांगला नव्हता. जेव्हा राहुल सेट होता, तेव्हा त्याला माघारी पाठवण्याच्या चांगल्या संधी मिळाल्या होत्या.' दरम्यान, किंग्स इलेव्हन पंजाबने या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 206 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 17 ओव्हर्समध्ये 109 रन्सवर ऑलआउट झाला.
महत्त्वाच्या बातम्या :