IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये आपली विजयी सुरुवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा झटका लागला आहे. पहिल्या सामन्यात खेळू न शकलेला संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, इशांत शर्मा पुढील दोन सामने खेळू शकणार नाही. 25 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत रंगणार आहे. दुखापतीमुळे या सामन्यासाठीही इशांत शर्मा खेळू शकणार नसल्याचं बोललं जात आहे.
दिल्ली कॅपिटल्समधील सुत्रांनी इशांत शर्मा चेन्नई विरूद्धचा सामना खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, 'इशांत शर्माच्या फिटनेसबाबत कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष करण्यात येणार नाही. इशांतला फिट होण्याची पूर्ण संधी दिली जात आहे. तसेच दुखापतीमुळे तो पुढील एक किंवा दोन सामने खेळू शकणार नाही.'
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने इशांत शर्माला झालेली दुखापत जास्त गंभीर नसल्याचंही सांगितलं आहे. संघाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, इशांत शर्माला फिजियो थेरपी देण्यात येत असून लवकरच त्याच्या प्रकृतीबाबत आणखी माहिती जाहीर करण्यात येईल.'
शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत रंगणार आहे. 29 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद विरोधात टूर्नामेंटमध्ये आपला तिसरा सामना खेळणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे इशांत शर्मा खेळू शकणार नाही.
पहिल्या सामन्यात इशांत शिवाय दिल्ली कॅपिटल्सची विजयाला गवसणी
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पहिल्या सामन्या इशांत शर्माची कमतरता जास्त जाणवली नाही. दिल्लीने रबाडाच्या शानदार गोलंदाजीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. परंतु, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमधील हा सामना खराब अंपायरिंगमुळ चर्चेत होता. अंपायरने 19व्या ओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा शॉर्ट रन असल्याचं सांगत एक रन कमी केला होता. परंतु, रिप्लेमध्ये समजून येत होतं की, हा शॉर्ट रन नव्हता. पंजाबच्या संघाने सामन्यानंतर अंम्पायरिंगबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या :