IPL 2020 KXIP Schedule : आयपीएलच्या 13व्या हंगामात पहिल्यांदाच विजेपदावर आपलं नाव कोरण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबने आपली कंबर कसली आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने या सीझनमध्ये आपल्या संघात अनेक मोठे बदल केले आहेत. दिग्गज खेळाडू अश्विनच्या स्थानी केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी दुबईतील मैदानावर दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्ससोबत अबूदाबीच्या मैदानावर लीग स्टेजमधील आपला शेवटचा सामना खेळणार आहे.

क्रमांकटीमतारीखवेळठिकाण
1दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब20 सप्टेंबर, 2020संध्याकाळी 7:30दुबई
2रॉयल चॅलेंजर्स बैंग्लोर वि. किंग्स इलेव्हन पंजाब24 सप्टेंबर, 2020संध्याकाळी 7:30दुबई
3राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब27 सप्टेंबर, 2020संध्याकाळी 7:30शारजाह
4किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियंस01 ऑक्टोबर, 2020संध्याकाळी7:30अबू धाबी
5किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स04 ऑक्टोबर, 2020संध्याकाळी 7:30दुबई
6सनराइजर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब08 ऑक्टोबर, 2020संध्याकाळी 7:30दुबई
7किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाइट रायडर्स10 ऑक्टोबर, 2020दुपारी 3:30शारजाह
8किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु15 ऑक्टोबर, 2020संध्याकाळी 7:30दुबई
9मुंबई इंडियंस वि. किंग्स इलेव्हन पंजाब18 ऑक्टोबर, 2020संध्याकाळी 7:30दुबई
10किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स20 ऑक्टोबर, 2020संध्याकाळी 7:30दुबई
11किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनरायजर्स हैदराबाद24 ऑक्टोबर, 2020संध्याकाळी 7:30दुबई
12कोलकाता नाइटरायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब26 ऑक्टोबर, 2020संध्याकाळी 7:30शारजाह
13किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स30 ऑक्टोबर, 2020दुपारी 7:30अबू धाबी
14चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब01 नोव्हेंबर, 2020दुपारी 3:30अबू धाबी

किंग्स इलेव्हन पंजाब अनिल कुंबळे आणि केएल राहुल यांच्या नेतृत्त्वात आपलं नाव विजेतेपदावर कोरण्यासाठी उत्सुक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझिलंडच्या विरुद्धच्या लढतीत मॅन ऑफ द सीरिजचा किताब जिंकणाऱ्या केएल राहुलला पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये राहुल संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

याव्यतिरिक्त किंग्स इलेव्हन पंजाबला ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लॅन मॅक्सवेलकडून खूप अपेक्षा आहेत. 2014मध्ये आयपीएलचे जे सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले त्यामध्ये मॅक्सवेल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. एवढचं नाहीतर संघात क्रिस गेल, मोहम्मद शमी यांसारख्या दिग्गज आणि रवि बिश्नोई सारख्या नव्या खेळाडूंमुळे संतुलन असल्याचं दिसत आहे. मोहम्मद शमीने किंग्स इलेव्हन पंजाबचा संघा सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :