IPL 2020 : आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये शनिवारी डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. परंतु, या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा संघ मोठ्या संकटात सापडला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज रिषभ पंत चेन्नई विरूद्धच्या सामन्यात संघाबाहेर राहणार आहे.


रिषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर असणार आहे. याच कारणामुळे गेल्या दोन सामन्यांमध्येही रिषभ पंत खेळू शकणार नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने रिषभ पंतच्या दुखापतीसंदर्भात सध्या काहीच माहिती देण्यात आलेली नाही. संघाच्या वतीने आधी दिलेल्या माहितीनुसार, रिषभ पंतला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागू शकतो.


रिषभ पंत संघात वापसी कधी करणार, यासंदर्भात दिल्ली कॅफिटल्सच्या वतीने आतापर्यंत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. रिषभ पंत ऐवजी सध्या संघात एलेक्स कॅरी विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळताना दिसत आहे. तसेच सध्या अजिंक्य रहाणेलाही संघात स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे.


इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. संघातील अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. अमित मिश्रा आणि ईशांत शर्मा आधीपासूनच दुखापतीमुळे 13व्या सीझनमधून बाहेर गेले आहेत.


दिल्ली कॅपिटल्ससाठी आणखी एक मोठी समस्या म्हणजे, कर्णधार श्रेयस अय्यरला झालेली दुखापत झाली आहे. गेल्या सामन्यात अय्यरच्या खांद्याला फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. जर श्रेयस अय्यर आजच्या सामन्यात सहभाग घेणार नाही. त्यामुळे शिखर धवन आजच्या सामन्यात संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :