MI vs KKR, IPL 2022:  लखनौ सुपर जायंट्सकडून मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर कोलकात्याचा संघ आज मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) भिडणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, मुंबईचा संघ तळाशी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालाय. दरम्यान, प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याचा संघ आज मुंबईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 11 सामन्यांत केवळ चार विजयांची नोंद करणाऱ्या कोलकात्याला उर्वरित तीन सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडं मुंबईचा संघ केवळ सन्मान वाचवण्यासाठी या स्पर्धेत खेळत आहे. 


हेड टू हेड रेकार्ड
आयपीएल 2022 चा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईतील डीवायपाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्स राखून पराभव केला. आयपीएलमध्ये  कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स एकूण 30 सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सनं 22 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सला केवळ 8 सामन्यांमध्ये पराभव करता आला आहे.


कधी,कुठे पाहणार सामना?
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज नऊ मे रोजी आयपीएल 2022 मधील 56 वा सामना खेळला जाणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातासापूर्वी नाणेफेक होईल.  मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येणार आहे. याशिवाय, मोबाईल ऍप डिस्ने हॉटस्टारही पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त सामन्यातील प्रत्येक अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही एबीपी माझाशी कनेक्ट राहा. 


हे देखील वाचा-