MS Dhoni on CSK Win: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी (Chennai Super Kings Vs Delhi Capitals) विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील हा सर्वात मोठा विजयही ठरला. या विजयानंतर चेन्नईचा कर्णधार कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) खूप आनंदी दिसत होता. सामना जिंकल्यानंतर धोनीनं आपल्या सहकारी खेळाडूं मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंह या दोन युवा वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीचंही मनभरून कौतूक केलं."आमचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला तर ही खूप मोठी गोष्ट असेल. पण, तसं झालं नाही तर जगाचा अंत होणार नाही", असं धोनीनं म्हटलंय.
मुकेश चौधरी आणि समिरजीतची भेदक गोलंदाजी
या सामन्यात मु्केश चौधरीनं तीन षटकात 22 धावा देऊन दोन विकेट्स घेतले. तर, सिमरजीतनं चार षटकात 27 धावा देऊन दिल्लीच्या दोन फलंदाजाला माघारी धाडलं. या दोन्ही युवा गोलंदाजांनी चेन्नईच्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. ज्यामुळं चेन्नईला दिल्लीवर मात करता आली.
प्लेमध्ये पोहचण्याबाबत धोनी काय म्हणाला?
"मला गणित करायला आवडतं नाही. शाळेत असतानाही माझं गणित कच्च होतं. नेट रन रेटच्याबाबतीत विचार करून काहीच उपयोग नाही. तुम्हाला फक्त आयपीएलचा आनंद घ्यायचा आहे. दोन संघ आमने सामने असताना त्यांनी रन रेटचा विचार करून खेळणं टाळावं. ज्यामुळं त्यांच्यावर अतिरिक्त दबाव येतो. पुढच्या सामन्यात तु्म्हाला कसं खेळायचं? फक्त याचाचं विचार केला पाहिजे. आमचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला तर ही खूप मोठी गोष्ट असेल. पण, तसं झालं नाही तर जगाचा अंत होणार नाही", असं धोनीनं म्हटलंय.
पुढे धोनी म्हणाला की, "मुकेश आणि सिमरजीत दोघांनी तयार होण्यासाठी वेळ घेतला. दोन्ही गोलंदाजांमध्ये खूप प्रतिभा आहे. ते जितकं जास्त क्रिकेट खेळतील, तितकं चांगलं त्याना मिळेल. कोणता चेंडू टाकायचा आणि कोणता नाहीत हे जाणून घेण्यातच गोलंदाजीचं यश दडलेलं असतं. विशेष म्हणजे, टी-20 क्रिकेटमध्ये कोणता चेंडू टाकायचा नाही", हे अधिक महत्वाचं असतं.
हे देखील वाचा-