IPL Playoff 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेच्या 15 व्या हंगामाची लवकरच सांगता होणार आहे. आता प्लेऑफचे सामने सुरु असून 29 मे रोजी तर फायनलही पार पडणार आहे. दरम्यान गुजरात टायटन्स (GT), राजस्थान रॉयल्स (RR), लखनौ सुपर जॉयंट्स (LSG) आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) या संघात प्लेऑफचे सामने खेळवले जात आहेत. आज पहिला क्वॉलीफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात पार पडणार असून या सामन्यापूर्वीच अंतिम सामन्यात कोणते दोन संघ असतील याची भविष्यवाणी इंग्लंडचा माजी क्रिकेटर ग्रीम स्वानने (Graeme Swann) केली आहे.

माजी क्रिकेटपटू ग्रीम स्वानने स्टार स्पोर्ट्सचा शो क्रिकेट लाईव्हमध्ये बोलताना कोणते दोन संघ फायनल खेळतील हे सांगितलं, त्याच्या मते ''राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिला क्वॉलीफायर होणार आहे. त्यानंतर फायनलमध्येही हेच दोन संघ जाणार असून गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी आयपीएल फायनल रंगेल. या दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं आहे. त्यामुळेच हेच दोघे फायनल खेळू शकतात.''

गुजरात-राजस्थानची साखळी सामन्यांत दमदार कामगिरी

गुजरात टायटन्स संघ यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा सर्वात पहिला संघ आहे. त्यांनी लीग स्टेजमध्ये 14 सामन्यांतील 10 सामने जिंकले, ज्यामुळे त्यांच्या नावावर सर्वाधिक 20 गुण आहेत. ज्यामुळे ते गुणतालिकेही टॉपवर आहेत. संघाकडून सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. त्यात कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचा संघाला बराच फायदा झाला. याशिवाय आयपीएलच्या साखळी सामन्यात राजस्थाननं ही दमदार प्रदर्शन केलं. दरम्यान, राजस्थाननं 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून 18 गुणांसह प्लेऑफमध्ये धडक दिली. या हंगामात राजस्थानला पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानसाठी जोस बटलरनं आक्रमक फलंदाजी केली. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अव्वल स्थानी आहे. याशिवाय, युजवेंद्र चहलनंही चांगल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. 

आयपीएल 2022 प्लेऑफच्या सामन्यांचं वेळापत्रक-

सामना  संघ  तारीख ठिकाण
क्वालीफायर-1 गुजरात टाइटंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स 24 मे 2022 कोलकता
एलिमिनेटर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर 24 मे 2022 कोलकाता
क्वालीफायर-2 एलिमिनेटरचा विजेता आणि पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेला संघ 27 मे 2022 अहमदाबाद
फायनल क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मधील विजेता संघ 29 मे 2022 अहमदाबाद

हे देखील वाचा-