IPL 2022 : सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नईचा 11 धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाब ने अष्टपैलू ऋषी धवनला (Rishi Dhawan) संघात स्थान दिले होते. ऋषी धवन 2016 नंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत होता. या सामन्यात ऋषी धवनला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण गोलंदाजीने ऋषी धवनने सर्वांचं लक्ष वेधलं. ऋषी धवन गोंलदाजीला आल्यानंतर चर्चेत आला होता. कारण ऋषी धवन याने गोलंदाजी करताना पेश शिल्ड लावले होते. त्यानंतर त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. त्याने फेस शिल्ड का घातले असेल? याची चर्चे सुरु झाली. याचे कारण समोर आले आहे.
 
काय आहे कारण? 
पाच वर्षानंतर अष्टपैलू ऋषी धवनला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. धवन याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण तो गोलंदाजीला आल्यानंतर चर्चेत होता. कारण फेस शिल्डमुळे.. त्याने फेस शिल्ड का घातलं? याचे कारणही तसेच आहे.... कोरोनाच्या भीतीमुळे नव्हे तर यामागील वेगळेच कारण आहे. ऋषी धवन याने रणजी स्पर्धेत दमदार कामगिरी केली. पण एका रणजी सामन्यावेळी गोलंदाजी करताना फलंदाजाने मारलेला चेंडू थेट ऋषी धवनच्या चेहऱ्यावर येऊन लागला होता.  तो दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळेच काळजी म्हणून आयपीएलमध्ये खेळताना ऋषी धवन फेस शिल्ड लावून गोलंदाजी करत होता. 


रणजी चषकात गोलंदाजी करताना झालेल्या दुखापतीमुळे ऋषी धवन पंजाबसाठी सुरुवातीच्या चार सामन्यांना उपलब्ध नव्हता. रणजी चषकादरम्यान चेंडू लागल्यामुळे त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखी दुखापत होऊ नये, म्हणून ऋषी धवन फेस शिल्ड घालून गोलंदाजी करत होता. 2013 मध्ये ऋषी धवन याने पंजाबकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2016 नंतर आता पुन्हा ऋषी धवन पंजाबकडून खेळत आहे. 


पंजाब किंग्सने सोशल मीडियावर ऋषी धवनचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. यामध्ये तो नेट प्रॅक्टिसमध्येही फेस शिल्ड घालून खेळताना दिसत आहे. 






सोशल मीडियावर चर्चा