लंडन : पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) सध्या इंग्लिश काउंटी डिवीजन वन (English County Division One) या स्पर्धेत खेळ असून तो लंकाशायर संघाकडून खेळत आहे. दरम्यान लंकाशायर आणि ग्लूस्टरशायर यांच्यात पार पडलेल्या सामन्यात हसन याने अतिशय शानदार असं प्रदर्शन दाखवलं. त्याने अप्रतिम गोलंदाजी केल्यामुळे ग्लॉस्टरशायरचा संघ केवळ 252 धावांवर ऑलआऊट झाला. यावेळी हसनने एकूण 6 विकेट्स मिळवल्या. याउलट लंकाशायरने 556 धावांवर 7 बाद या विशाल धावसंख्येवर डाव घोषित केला.


दुसऱ्या डावात चमकला हसन


सामन्याच्या दुसऱ्या डावात हसन अलीने त्याच्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच हैरान करुन सोडलं. समोरच्या संघाचे फलंदाज तर त्याच्यासमोर धावाच करु शकत नव्हते. या दरम्यानच हसन याने एक असा वेगवान आणि भेदक यॉर्कर टाकला जो समोरील फलंदाजाला खेळता आला नाहीच उलट तो या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. पण विशेष म्हणजे यावेळी लाकडी स्टम्पचे दोन तुकडे देखील झाले. ग्लॉस्टरशायरचा फलंदाज जेम्स ब्रेसी याचा मधला स्टम्प हसन अलीने उडवताना त्याचे झालेले दोन तुकडे आणि हा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे. ही घटना ग्लॉस्टरशायरच्या दुसऱ्या डावातील 25 व्या ओव्हरमध्ये पार पडली. हा व्हिडीओ लंकाशायर संघाने देखील त्यांच्या सोशल मीडिया शेअर केला आहे. 



हे देखील वाचा-