LSG vs RCB, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स (LSG) आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) या गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघानी यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत चार-चार विजय मिळवले असून आज जिंकणारा संघ चौथा विजय नावावर करणार आहे. आयपीएलमधील दोन्ही संघाचा हा सातवा सामना असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात कोणते खेळाडू चांगली कामगिरी करतील याकडे सर्वांचे लक्ष असून पण तरी आतापर्यंतच्या खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...


राजस्थान विरुद्ध कोलकाता अशी असेल ड्रीम 11 (RR vs KKR Best Dream 11)


विकेटकीपर- क्विंटन डी कॉक, दिनेश कार्तिक


फलंदाज- केएल राहुल, फाफ डु प्लेसीस, विराट कोहली


ऑलराउंडर- दीपक हुडा, ग्लेन मॅक्सवेल,


गोलंदाज- हर्षल पटेल, जोश हेझलवुड, रवी बिश्नोई, आवेश खान.


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. खेळपट्टीचा विचार करता याठिकाणी दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होत आहे. पण याआधी झालेल्या सायंकाळच्या दोन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे. गुजरात आणि चेन्नई दोन्ही संघानी प्रथम फलंदाजी करत एक मोठं आव्हान समोरच्या संघाला दिलं. जे दुसऱ्यांदा फलंदाजी करताना समोरील संघ पार करु शकला नाही आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला.


हे देखील वाचा-