LSG vs RCB : आज आयपीएल 2022 मधील दोन दमदार संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये एकीकडे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणारा लखनौ सुपरजायंट्सचा संघ (LSG) तर दुसरीकडे गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेला रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) हा संघ असणार आहे. दोन्ही संघानी यंदाच्या स्पर्धेत सहा पैकी चार सामने जिंकत आठ गुण मिळवले आहेत. पण बंगळुरुचा रनरेट लखनौपेकक्षा काहीसा कमी असल्याने ते तिसऱ्या तर लखनौ दुसऱ्या स्थानावर आहेत. पण आज विजय मिळवून बंगळुरु लखनौला मागे टाकू शकते. आज जिंकणाऱ्या संघाच्या खात्यात 10 गुण येणार असून नेट रनरेट चांगला ठेवल्या पहिल्या स्थानावरील गुजरातची जागाही विजयी संघ घेऊ शकतो.
या सर्वामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आयपीएलमधील (IPL 2022) या महत्त्वपूर्ण सामन्या दोन्ही संघाकडून कोणत्या खेळाडूंना अंतिम 11 मध्ये संधी मिळेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण तरी आतापर्यंतच्या खेळीच्या जोरावर कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल यावर एक नजर फिरवूया...
लखनै संभाव्य अंतिम 11
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
बंगळुरु संभाव्य अंतिम 11
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, आकाश दीप, मोहम्मद सिराज
हे देखील वाचा-
- Yuzvendra Chahal : चहलच्या ज्या फोटोवर तयार झाले होते मीम्स, त्याच स्टाईलमध्ये केलं हॅट्रिकचं सेलिब्रेशन, पाहा Video
- IPL 2022 : आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्लीचे फिजियो कोरोना पॉझिटिव्ह
- Covid-19 Hits IPL 2022 : आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट, दिल्लीच्या खेळाडूला बाधा, आगामी सामन्यासाठी पुण्यालं जाणं रद्द