Quinton De Kock Catch : क्रिकेटमध्ये कायम म्हटलं जातं, 'कॅचेस विन मॅचेस'. याचा अर्थ एखादा झेल संपूर्ण मॅच पलटवू शकतो, अनेकदा षटकार जाणारा चेंडू झेल घेत सामना गोलंदाजी करणाऱ्यांकडे फिरतो. तर अनेकदा एखादा सुटलेला झेल फलंदाजी करणाऱ्या संघाला जीवदान देऊन सामनाही नावावर करतो. बुधवारी कोलकाता-लखनौ संघातील सामन्यातही असंच काहीसं झालं. सामन्यात नाबाद 140 धावांची तगडी खेळी करणाऱ्या क्विंटनचा झेल सामन्याच्या तिसऱ्या षटकात केकेआरच्या अभिजीत तोमरने सोडला होता. ही चूकच त्यांना अत्यंत महाग पडली.
कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करत लखनौने एकही विकेट न गमावता तब्बल 210 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्याचा पाठलाग करताना केकेआरने 20 षटकात 208 धावांपर्यंत मजल मारली पण थोडक्यात लक्ष्यापासून पाठी राहिलेल्या केकेआरला दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान यावेळी केकेआरच्या संघाने खराब गोलंदाजी केलीच, पण तिसऱ्या षटकात अभिजीत तोमरने केलेली एक चूक संघाला अत्यंत महाग पडली.
नेमकं काय घडलं?
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी लखनौने घेतली. यावेळी त्यांनी एकही विकेट न गमावता 210 धावा स्कोर बोर्डवर लावल्या. यावेळी क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत नाबाद 140 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 51 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली.दरम्यान क्विंटनने केलेल्या या भव्य खेळीची सुरुवात होतानाच तो बाद झाला असता, कारण तिसऱ्या षटकात उमेश यादवने टाकलेल्या दुसऱ्याच चेंडूवर क्विंटनचा झेल उडाला, पण थर्ड मॅनच्या जागी क्षेत्ररक्षण करणाऱ्या अभिजीतच्या हातातून हा झेल सुटला आणि क्विटंनला जीवदनदान मिळालं. त्यानंतरच त्याने नाबाद 140 धावांची खेळी केली. ज्यामुळे त्यांचा स्कोर 210 पर्यंत पोहोचला आणि केकेआरला तिथवर पोहोचता न आल्याने ते पराभूत झाले.
हे देखील वाचा-
- Watch Video : लखनौचा कोलकात्यावर रोमहर्षक विजय, मेंटोर गौतम गंभीरची रिएक्शन व्हायरल
- Quinton de Kock : क्विंटन डी कॉकची धडाकेबाज खेळी, नावावर केला 'हा' नवा विक्रम
- IPL 2022 : हैदराबादविरुद्धही मुंबई पराभूत, खराब प्रदर्शनानंतर कर्णधार रोहितनं सांगतिला 'फ्यूचर प्लॅन'