RCB vs GT : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) हे संघ मैदानात उतरणार आहेत. गुजरातचा संघ तब्बल 10 विजयांसह आधीच प्लेऑफममध्ये पोहोचला आहे. पण बंगळुरुसाठी प्लेऑफचं आव्हान अजूनही खडतर आहे. त्यांना आज एका मोठ्या फरकाने जिंकणं अत्यंत गरजेचं असणार आहे. त्यामुळे आज त्यांच्याकडू विजयासाठी शर्थीचे प्रयत्न नक्कीच होतील. दुसरीकडे गुजरातला त्यांची विजयी घोडदौड सुरु ठेवायची असल्याने तेही संपूर्ण प्रयत्न आज सामना जिंकण्यासाठी करतील. 


गुणतालिकेचा विचार करता गुजरात टायटन्सने 13 पैकी 10 सामने जिंकत 20 गुण मिळवले आहेत. तर बंगळुरुच्या संघाने 13 पैकी 7 सामने जिंकल्याने त्यांच्या खात्यावर 14 गुणच आहेत. आता आज बंगळुरुची कामगिरी आणि त्यानंतर इतर संघाचे सामने आणि गुणतालिकेच्या गणितावर बंगळुरुचं पुढील फेरीत पोहचणं अवलंबून असणार आहे. आजचा सामना सायंकाळी असल्यानं दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे, पण मागील सामन्याचं पाहता आज नाणेफेक जिंकणारा नेमका कोणता निर्णय घेईल हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.


कधी आहे सामना?


आज 19 मे रोजी होणारा रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-