Quinton de Kock Record : सध्या आयपीएल 2022 चा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामात खेळाडू नव नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहेत. कालच्या सामन्यात लखनौ सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या विजयाने लखनौ सुपर किंग्जने आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. लखनौच्या विजयात कर्णधार के एल राहुल (KL Rahul) तसेच क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डी कॉकने नाबाद शतक झळकावले आहे. डी कॉकने 70 चेंडूत 140 धावा केल्या. या खेळीमुळे त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.


काल झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात डी कॉकने आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली आहे. वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत त्याने एबी डिव्हिलियर्स आणि के एल राहुलला मागे टाकले आहे. डी कॉकने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 10 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 140 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीने अनेक विक्रम मोडले आहेत. आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत डी कॉक तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने डिव्हिलियर्स आणि राहुलला मागे टाकले आहे. डिव्हिलियर्सची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 133 आहे. तो चौथ्या स्थानावर आहेत. तर के एल राहुल 132 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.


आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने एका सामन्यात नाबाद 175 धावा केल्या होत्या. या बाबतीत ब्रेडन मॅकॉलम दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 158 धावांची नाबाद खेळी खेळली. तर डेकॉक आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्याने नाबाद 140 धावा केल्या आहेत.


आईपीएलमध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा करणारे खेळाडू 


175 - क्रिस गेल
158 - ब्रैंडन मैक्क्लम
140  - क्विंटन डी कॉक
133 - एबी डिविलियर्स
132 - के एल राहुल


दरम्यान, कालच्या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलची वादळी खेळी आणि मोहसिन खान आणि मार्कस स्टॉयनिसच्या भेदक माऱ्यापुढं कोलकात्याचा संघानं गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करत लखनौच्या संघानं कोलकात्यासमोर 20 षटकात एकही विकेट गमावता कोलकात्यासमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत कोलकात्याच्या संघाला 208 धावांवर रोखलं. अखेरच्या षटकात कोलकात्याच्या संघाला 21 धावांची गरज असताना मार्कस स्टॉयनिसनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. लखनौच्या संघानं हा सामना फक्त दोन धावांनी जिंकला.