SRH vs GT : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) या दोन दमदार संघात सामना पार पडणार आहे. गुजरात संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नसल्याने त्यांचं आव्हान हैदराबादसाठी अवघड असणार यात शंका नाही. पण दोन सामने गमावलेल्या हैदराबादने नुकताच बलाढ्य चेन्नई संघावर विजय मिळवल्याने त्यांच्याकडून देखील चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. गुजरातने आतापर्यंत तीन पैकी तीन सामने जिंकले असून हैदराबादने तीन पैकी एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघाना आजचा विजय गुणतालिकेत झेप घेण्यासाठी महत्त्वाचा आहे.


कधी आहे सामना?


आज 11 एप्रिल रोजी होणारा हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha