MI vs KKR : आज पार पडणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. केकेआरने यंदाच्या आयपीएलमध्ये 3 पैकी 2 सामने जिंकल्याने ते आपला चांगला फॉर्म कायम ठेवण्याच्या तयारीत असून मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या दोन पैकी दोन्ही सामने गमावल्याने ते विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. आयपीएलमधील (IPL 2022) या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडे धाकड खेळाडूंची फौज असली तरी आज कोणत्या खेळाडूंना अंतिम 11 मध्ये संधी मिळेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


आज पार पडणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी याआधीच्या सामन्यात खेळलेल्या खेळीचा विचार करता नेमके कोणते खेळाडू (Probable 11 for MI vs KKR) मैदानात उतरु शकतात यावर एक नजर फिरवूया...


मुंबईचे संभाव्य अंतिम 11  


रोहित शर्मा (कर्णधार) ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी. 


केकेआरचे संभाव्य अंतिम 11 


अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha