GT vs SRH : आज यंदाच्या आयपीएलमधील दमदार कामगिरी करणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर आव्हानही यंदा उत्तम कामगिरी करणाऱ्या हैदराबाद संघाचे असेल. गुणतालिकेचा विचार करता गुजरातने 7 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन तिसरं स्थान मिळवलं आहे.
आजचा सामना होणाऱ्या मुंबईतील वानखेडे मैदानातील सीमारेषा पाहता मोठा स्कोर उभा राहण्याची शक्यता आहे. त्यात मागील काही सामन्यांपासून प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. पण आजचा सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण होऊ शकते. दरम्यान दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण तरी आतापर्यंतच्या खेळीच्या जोरावर कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल यावर एक नजर फिरवूया...
गुजरात संभाव्य अंतिम 11
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी
हैदराबाद संभाव्य अंतिम 11
अभिशेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उम्रान मलिक, टी. नटराजन.
हे देखील वाचा-
- GT vs SRH, Pitch Report : गुजरात आणि हैदराबाद आमने-सामने; कशी असेल मैदानाची स्थिती?
- आरसीबीचा पराभव करत गुजरातला टाकले मागे, राजस्थानचा हल्लाबोल, पर्पल-ऑरेंज कॅपवरही कब्जा
- IPL 2022 : हम तो डूबे हैं सनम...., मुंबई इंडियन्स कुणाची वाट लावणार? या चार संघाना धोका
- Hasan Ali : इंग्लडमध्ये हसन अलीची घातक गोलंदाजी, यॉर्कर फेकून स्टम्पचे केले तुकडे, पाहा VIDEO