CSK vs MI : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) आज पार पडणाऱ्या 59 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणार आहे. दोन्ही संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपले असले तरी मुंबई आणि चेन्नई या संघाचा अटीतटीचा इतिहास असल्याने अनेकांचे लक्ष्य आजच्या सामन्याकडे लागून आहे. आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकत 8 गुणांसह नववं स्थान मिळवलं आहे. तर मुंबई 11 पैकी 9 सामन्यात पराभूत होत दहाव्या स्थानावर आहे. दोघांनी आतापर्यंतच्या स्पर्धेत लौकिकाला अजिबात साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे आज एकमेंकाचा सामना होताना कोण बाजी मारेल? हे पाहणं औत्सुक्याचं राहिलं. तर आजच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर फिरवूया...
चेन्नई विरुद्ध मुंबई Head to Head
आयपीएलमध्ये आजवर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे संघ तब्बल 33 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचंच पारडं जड राहिलं आहे. मुंबईने 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 14 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.
आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
चेन्नई - डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ड्वेन ब्रॉवो, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सीमरजीत सिंह
मुंबई - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, रमनदीप सिंह, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, रिले मॅरिडथ, कुमार कार्तिकेय
हे देखील वाचा-
- Ravichandran Ashwin : दिल्लीविरुद्ध आश्विनची बॅट तळपली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, राजस्थानचा पंतलाही टोला
- Virat Kohli : खराब फॉर्मवर विराट कोहलीकडून एका वाक्यात टीकाकारांना उत्तर, म्हणाला..
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?