CSK vs MI : आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही यंदा खराब कामगिरीमुळे गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात आज सामना पार पडणार आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी अनुक्रमे 7 आणि 9 सामने गमावल्याने ते नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. दोघांचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं असलं तरी दोन्ही संघाती आजवरचा इतिहास चुरशीचा असल्याने आजही या लढतीकडे अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य असेल.

Continues below advertisement

आजचा चेन्नई सुपरकिंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. इतर मैदानांच्या तुलनेत वानखेडेची सीमारेषा काहीशी छोटी असल्याने चौकार-षटकारांची बरसात याठिकाणी होते. त्यामुळे मोठी धावसंख्या उभा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आजचा सामना सायंकाळी असल्यान दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेऊ शकतो.

कधी आहे सामना?

Continues below advertisement

आज 12 मे रोजी होणारा चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  

कुठे आहे सामना?

हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?

चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 

हे देखील वाचा-