ICC Player Rankings: आयपीएलचा रनसंग्राम सुरु असतानाच आयसीसीने खेळाडूंची रॅकिंग जारी केली आहे. वनडेमध्ये सलामी फलंदाज शुभमन गिल याने मोठी झेप घेतली आहे. तर विराट कोहलीलाही फायदा झाला आहे. टी२० मध्ये सूर्यकुमार यादव आघाडीवरच आहे. तर वनडे गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नुकत्याच जारी झालेल्या आयसीसी क्रमवारीत शुभमन गिल याला एका क्रमाचा फायदा झाला आहे. गिल ७३८ रेटिंग गुणासह चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याशिवाय विराट कोहलीलाही फायदा झाला आहे. विराट कोहली सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याशिवाय रोहित शर्मा आठव्या स्थानावर आहे. आघाडीच्या दहा फलंदाजात भारताचे तीन फलंदाज आहेत. एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या क्रमांकवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आफ्रिकेचा रासीवॅन दुसे आहे.
गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर आहे. तर ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा युवा गोलंदज मोहम्मद सिराज या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी २० फलंदाजीच्या रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजीत राशिद खान आघाडीवर आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्याचा अपवाद वगळता भारताचा एकही खेळाडू आघाडीच्या दहा खेळाडूमध्ये नाही.
कोणता संघ कोणत्या क्रमांकावर ?
टी२० मध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.